अमळनेर पोलिसांत तरूण त्याची बहीण मेहुण्याविरुद्ध बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल
अमळनेर :- विवाहापूर्वी शारीरिक संबंध ठेवून लग्नास विरोध करणाऱ्या सडावण येथील तरुणासह त्याच्या बहीण मेहुण्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. शिंदखेडा येथील एका तरुणीचा विवाह सडावण (ता.अमळनेर) येथील समाधान ऊर्फ राज पंडित दाभाडे याच्याशी ठरला होता. २६ जानेवारीला शिंदखेडा येथे त्यांचा साखरपुडा झाला. यादरम्यान समाधान व पीडित मुलगीचे मोबाईलवर बोलणे व्हायचे. २३ एप्रिलला समाधान याने भावी पत्नीला फोन करून कपडे घ्यायचे आहेत, म्हणून ‘एकटी ये’, असे सांगितले. मुलीने माझे वडील एकटी येऊ देणार नाहीत, असे सांगितले.
त्यावर त्याने सांगितले, की ‘माझे बहीण मेहुणेही सोबत आहेत. तू एकटी आली नाही, तर मी तुझ्याशी लग्न करणार नाही’. त्यावेळी मुलीच्या वडिलांनी संमती दिली. मुलगी बसने अमळनेरला आली. समाधान तिला घ्यायला आला. त्याने मुलीला बहीण सपना व मेहुणे मुकेश साळुंखे यांच्या घरी नेले. तेथून दोघांनी समाधान व मुलीला खरेदीसाठी पाठविले. समाधान याने कपडे खरेदी न करता खाण्यापिण्यात वेळ घालवून उशीर केला आणि परत बहिणीच्या घरी नेले. तोपर्यंत बहीण मेहुणे सडावण येथे निघून गेले होते. मुलीने समाधानला मामाच्या घरी ताडेपुरा येथे सोड, असा आग्रह धरला.
मात्र, समाधानने ऐकले नाही व रात्रभर येथेच थांबून शारीरिक संबंध करण्याचा आग्रह धरला. मुलीच्या इच्छेविरुद्ध त्याने बळजबरीने शारीरिक संबंध केले आणि कोणाला सांगितले तर मी तुझ्याशी लग्न करणार नाही, अशी धमकी दिली.२९ एप्रिलला लग्न असल्याने मुलीने भीतीपोटी कोणालाच सांगितले नाही. २८ एप्रिलला त्याने लग्न करण्यास नकार दिला. आजपर्यंत समाजाच्या लोकांची मध्यस्थी करून वाट पाहूनही त्याने लग्नास नकार दिला, म्हणून तरुणीच्या फिर्यादीवरून समाधान, त्याची बहीण सपना, मेहुणे मुकेश साळुंखे यांच्याविरुद्ध बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित सावळे तपास करीत आहेत.
हे पण वाचा
- भाजीपाला घेऊन घरी जात असलेल्या महिलेस मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्र अन् मोबाइल पतीनेच पळवले, काय आहे प्रकरण वाचा.
- एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे चौदा वर्षीय अल्पवयीन बालकाची गळा चिरून हत्या; संतप्त ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन.
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.