भिवानी (हरियाणा):- अनैतिक संबंधातून झालेल्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका दिराने आपल्या वहिनीची गळा कापून हत्या केली. असं सांगण्यात आलं की, दिराचे वहिनीसोबत अनैतिक संबंध होते. पण यादरम्यान वहिनीचे आणखी एका दुसऱ्या व्यक्तीसोबतही संबंध जुळले होते. याची माहिती दिराला लागली. अशात रागात दिराने वहिनीची हत्या केली.
4 वर्षापासून सुरू होतं अफेअर
हरयाणाच्या भिवानी जिल्ह्यातील ही घटना आहे. पोलिसांनी सांगितलं की, तिगडाना गावातील तरूणाचे त्याच्या वहिनीसोबत अनैतिक संबंध होते. असं सांगण्यात आलं की, दोघांमध्ये तब्बल 4 वर्षापासून संबंध सुरू होते. महिलेच्या पतीला याची काहीच कल्पना नव्हती. पण अशातच महिलेचं आणखी एका दुसऱ्या व्यक्तीसोबत अफेअर सुरू झालं. याची माहिती दीर दीपकला मिळाली तेव्हा तो चांगलाच संतापला. दीपकला त्याच्या वहिनीसोबत लग्न करायचं होतं. याबाबत तो तिच्यासोबत बोलणारच होता.
पण त्याआधीच वहिनीचा कारनामा त्याला समजला. यावरून दोघांमध्ये भांडणही होत होतं. दीपक वहिनीला असं करण्यास मनाई करत होता. पण तिने त्याचं ऐकलं नाही. याच कारणाने तिला आपला जीव गमवावा लागला. महिलेच्या पतीने आपल्या मावस भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणाचा खुलासा करत पोलिसांनी सांगितलं की, मृत महिलेच्या तक्रारीनंतर आरोपी दीपक याला अटक करण्यात आली आहे. त्याचे त्याच्या वहिनीसोबत चार वर्षापासून अनैतिक संबंध होते. जेव्हा त्याला समजलं की, वहिनीचं आणखी एका व्यक्तीसोबत अफेअर सुरू आहे तेव्हा त्याने रागाच्या भरात वहिनीची गळा कापून हत्या केली.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






