सातारा :- जिल्ह्यात 18 वर्षाच्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेयसीने लग्नासाठी दबाव टाकल्याने त्याने आत्महत्या केली अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.बापू काळे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. बापू सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील वावरहिरे येथील रहिवासी आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बापूच्या आई कविता हीने दहिवडी पोलिस ठाण्यात प्रेयसीविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
बुधवारी दुपारी बापू आणि तीच्या प्रेयसी यांच्यात भांडण झाले होते. लग्न करण्यासाठी प्रेयसी त्याच्यावर दबाव टाकत होती. त्याला भरपूर शिवीगाळ केली आणि त्यानंतर त्याला मानसिक छळ देऊ लागली. याच गोष्टीला कंटाळून बापूने आत्महत्या केली.राहत्या खोलीत घरी कोणी नसताना त्याने पंखाला लटकून आत्महत्या केली.
दरवाजा आतून बंद असल्याने कोणीही प्रतिसाद देत नसल्याने ग्रामस्थांनी आणि कुटुंबानी दरवाजा तोडला. त्यांना बापू लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी अल्पवयीन मुलीची रवानगी रिमांड होममध्ये होण्याची शक्यता आहे. पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हे पण वाचा
- चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांची पंढरपूर वारी सायकलीने.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- एरंडोल येथील उड्डाणपुलाजवळ रस्त्यात खड्डा पडल्याने अडकत आहेत अनेक वाहन; सदर खड्डा कोण बुजवणार मोठा प्रश्न ?
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.