Viral Video नवी दिल्ली :- दिल्ली मेट्रो प्रवासाशिवाय इतर गोष्टींसाठीच वापरलं जातंय की काय! अशी शंका घेण्यास वाव आहे. कारण, दररोज दिल्ली मेट्रोमधील चित्र-विचित्र व्हिडिओ समोर येत असतात. दिल्ली मेट्रोमध्ये कोणी अश्लील चाळे करताना दिसतं, कोणी अश्लील डान्स करतं, भांडणं होतात, कोणी रील्स बनवतं.असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.एक तरुणीचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये तरुणी महिलांच्या डब्यामध्ये बेधुंद होऊन कथित अश्लील डान्स करताना दिसत आहे.
तरुणी एका व्हिडिओमध्ये भोजपुरी गाण्यावर डान्स करत आहे, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तरुणी हिंदी गाण्यावर डान्स करत आहे. ती डान्स करताना कोणीतरी तिचा व्हिडिओ काढत असल्याचं समजतं.तरुणी महिलांच्या डब्यात होती. काही महिला प्रवासी त्याठिकाणी होत्या. त्यावेळी अचानक तरुणी डान्स करायला सुरुवात करते. ती एका ठिकाणाहून दुसरीकडे पळत जाते आणि कथित अश्लील स्टेप्स करण्यास सुरुवात करते. अन्य महिला प्रवासी तिच्याकडे आश्चर्याने पाहात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. काही तिच्याकडे पाहून हसतात देखील.काही दिवसांपूर्वी दोन तरुणी दिल्ली मेट्रोमध्ये अश्लील डान्स करताना पाहायला मिळाल्या होत्या.
याची दखल पोलिसांनी घेतली होती. दोन्ही तरुणींवर पोलिसांनी कारवाई केली होती. आता या नव्या व्हिडिओवर देखील पोलीस कारवाई करणार का असा प्रश्न विचारला जात आहे. व्हिडिओमध्ये तरुणी क्रॉप टॉप आणि स्कर्टमध्ये दिसत आहे.अनेक तरुण-तरुणींना सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याचं वेड लागलं आहे. शिवाय आपल्या रील किंवा व्हिडिओला चांगले व्ह्युज आणि लाईक मिळावेत यासाठी ते काहीही करायला मागे-पुढे पाहात नाहीत असं चित्र आहेत. ताजा व्हिडिओ त्यातलाच एक म्हणावा लागेल. दिल्ली मेट्रोमध्ये रील्स बनवण्यास मनाई करण्यात आली आहे. शिवाय सुरक्षारक्षक देखील तैनात करण्यात आले आहेत. पण, याकडे अनेक कथित रील्स स्टारच दुर्लक्ष होत असल्याचं दिसतंय.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






