यावल : तालुक्यातील साकळी या गावाजवळील भोनक नदीच्या पुलावर एका रिक्षा द्वारे तीन जण प्रतिबंधित गुटखा वाहतूक करीत होते. याबाबतची गोपनीय माहिती यावल पोलिसांना मिळाली तेव्हा पोलिसांच्या पथकाने कारवाई करीत एक लाख ३७ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.ही कारवाई सोमवारी सकाळी करण्यात आली
साकळी ता. यावल या गावाच्या जवळ भोनक नदी आहे. या भोनक नदीच्या पुलावरून रिक्षा क्रमांक एम. एच.१९ सी.डब्ल्यू. ३५४९ मध्ये प्रमोद जगन्नाथ बुरूजवाले रा.यावल, शेख रफिक शेख मुनाफ मन्यार रा.साकळी, संदीप उर्फ बापू सोपान धनगर रा.यावल हे तिघे प्रतिबंधित गुटखा वाहतूक करीत होते. तेव्हा याबाबतची माहिती यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळाली. तेव्हा त्यांनी पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फर खान, हवालदार सिकंदर तडवी, अलाउद्दीन तडवी या पथकाला त्या ठिकाणी जाऊन कारवाईचे आदेश दिले.
या पथकाने त्या ठिकाणी जाऊन कारवाई करीत रिक्षा तसेच प्रतिबंधित विमल गुटखा असा एकूण एक लाचा ३७ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे व या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार अलाउद्दीन तडवी यांच्या फिर्यादीवरून तीन जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीघांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये करीत आहे.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा