अररिया (बिहार) :- तरुण आणि त्याच्या अल्पवयीन मेहुणीचा पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यू नंतर संतप्त जमावाने पोलीस २ ठाणे पेटवून दिले. ही धक्कादायक घटना बिहारच्या अररिया जिल्ह्यातील ताराबारी येथे घडली. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याने झालेल्या गोंधळात दोन ग्रामस्थही जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी उग्र निदर्शने करत पोलिसांवर दगडफेकही केल्याचे वृत्त ‘इंडिया टूडे’ने दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ताराबारी पोलीस स्टेशन हद्दीतील किस्मत खवासपूर येथील मंटू सिंग यांच्या पत्नीच्या मृत्यू झाला. यानंतर त्याने आपल्या अल्पवयीन मेहुणीशी लग्न केले होते. गुरुवारी (16 मे) पोलीस या तरुणाच्या घरी आले. या दोघांनाही पोलीस २ ठाण्यात आणण्यात आले. मुलगी अल्पवयीन असल्याने तरुणावर गुन्हा दखल करण्यात आला. दोघांनाही चौकशीसाठी पोलीस ९ ठाण्यात नेण्यात आले. कोठडीत त्यांनी जीवन संपविल्याचा दावा पोलिसांनी केला. तर पोलिसांच्या बेदम मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी दगडफेक केली. यानंतर पोलीस ठाण्याची तोडफोड करत जाळपोळ केली.
जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांचा गोळीबार
तरुण आणि त्याच्या अल्पवयीन मेहुणीचा पोलीस कोठडीत मृत्यूझाल्याचा आरोप करत संतप्त जमावाने प्रथम पोलीस ठाण्याततोडफोड केली. यानंतर पोलीस ९ ठाणे पेटवून दिले. पोलिसांनीस्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याने झालेल्या गोंधळात दोनग्रामस्थही जखमी झाले. पोलीस ठाण्यात असलेल्या सीसीटीव्हीफुटेजमध्ये तरुणाने कोठडीत गळफास लावून घेतानाचेचित्रीकरण झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पोलिसांवरही दगडफेक
पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याने झालेल्या गोंधळात दोन ग्रामस्थही जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी उग्र निदर्शने करत पोलिसांवर दगडफेकही केली. यामध्ये पाच ते सहा पोलीस अधिकारी जखमी झाले, त्यापैकी दोन गंभीर जखमी झाले. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल सुमारे सहा राऊंड गोळीबार केला, ज्यात दोघांना अनुक्रमे पायाला आणि हाताला गोळ्या लागल्या. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. या गोंधळाला जबाबदार असलेल्या दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याच्या प्रकरणाचाही तपास सुरू आहे.
हे पण वाचा
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.
- जिल्ह्यात गावठी कट्टे विकणाऱ्यां दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केले जेरबंद; 1 लाख 70 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.
- 60 वर्षीय व्यक्तीने विधवा महिलेवर केला बलात्कार, नराधमास धडा शिकविण्यासाठी लैंगिक अत्याचार झालेल्या अनेक महिलांनी आरोपीस जिवंत जाळले