पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने थेट पोलिस ठाणे गाठले; पोलिसांना सांगितलं खूनाचं कारण

Spread the love

शिक्रापूर – वारंवार वाद होत असल्याने पतीने पत्नीचा चाकूने भोकसून खून केला. यानंतर पती स्वतः पोलिसांत हजर झाल्याची धक्कादायक घटना केंदूर (ता. शिरूर) येथे घडली. आशा रामदास पवार (वय 45, रा. मातंगवस्ती, केंदूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी रामदास उर्फ भाऊ लक्ष्मण पवार (वय 55) याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. रामदास व त्याची पत्नी आशा यांच्यात वारंवार वाद होते. पत्नी करत असलेल्या वादामुळे रामदास त्रस्त होता. पत्नीमध्ये कधी तरी सुधारणा होईल या आशेने काही बोलत नव्हता. 31 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास पुन्हा रामदासचा पत्नी आशासोबत वाद झाला.

रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास राग अनावर झाल्याने चाकू घेऊन पत्नीच्या तोंडावर, हातावर, डोक्‍यावर मारून गंभीर जखमी करत पत्नीला ठार केले. आणि थेट पाबळ पोलीस चौकी गाठली. तेथे उपस्थित असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल ढेकणे यांना मी पत्नीचा खून केला आहे, असे सांगितले.ढेकणे यांनी याबाबत पोलीस पाटील सुभाष साकोरे यांना घटनेची खात्री करण्यास सांगितले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, अनिल ढेकणे, हवालदार चंद्रकांत काळे, सचिन होळकर, अतुल पखाले, विशाल देशमुख यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला.

टीम झुंजार