नागपुर:- येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीसोबत झालेल्या भांडणानंतर पत्नीने आपल्या तीन वर्षांच्या निष्पाप मुलीचा गळा दाबून तिची हत्या केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येनंतर ही महिला आपल्या मुलीचा मृतदेह घेऊन जवळपास 4 किलोमीटर रस्त्यावर फिरत राहिली. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आरोपी महिला, 23 वर्षीय ट्विंकल राऊत आणि तिचा पती राम लक्ष्मण राऊत (वय 24) हे चार वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात नागपूरला आले होते. ते एका पेपर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत काम करत होते आणि एमआयडीसी परिसरातील हिंगणा रोडवरील कंपनीच्या आवारात एका खोलीत राहत होते, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
पती-पत्नीमध्ये वारंवार होत होती भांडणे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती पत्नीमध्ये त्यांच्या नात्यातील अविश्वासामुळे वारंवार भांडणे होत होती. सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये मोठं भांडण झालं. त्यांचा जोरदार वाद सुरू असताना त्यांची मुलगी रडायला लागली. संतापलेल्या पत्नीने आपल्या मुलीला घराबाहेर काढले आणि मुलीचा गळा दाबून तिची हत्या केली.त्यानंतर ती चिमुरड्या मुलीचा मृतदेह घेऊन सुमारे चार किलोमीटर चालत फिरत होती. रात्री आठच्या सुमारास पोलिसांचे गस्तीचे वाहन दिसले आणि त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी मुलीला रुग्णालयात नेले जेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.पोलिसांनी नंतर महिलेला अटक केली आणि तिच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल असे त्यांनी सांगितले. महिलेला नंतर न्यायालयात हजर करण्यात आले, तिला 24 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे पण वाचा
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.
- जिल्ह्यात गावठी कट्टे विकणाऱ्यां दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केले जेरबंद; 1 लाख 70 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.
- 60 वर्षीय व्यक्तीने विधवा महिलेवर केला बलात्कार, नराधमास धडा शिकविण्यासाठी लैंगिक अत्याचार झालेल्या अनेक महिलांनी आरोपीस जिवंत जाळले