Viral Video: मेहुणी आणि भावोजींचं नातं खूप खास असतं. त्यांच्यामध्ये कायम चेष्टा – मस्करी सुरु असते. भावोजी हे काही वेळा भाऊ किंवा वडिलांप्रमाणे मेहुणीच्या पाठिशी उभे असतात. सोशल मीडियावर भावोजी आणि मेहुणीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.लग्नामध्येही नवरीनंतर मेहुणी आपल्या भावोजींची काळजी घेत असते.भावोजी आणि मेहुणीमध्ये अनेकदा घट्ट मैत्री बघायला मिळते. त्या दोघांची मैत्री बघून अनेकदा नवरीला आश्चर्य वाटतं. काही वेळा तिला त्या दोघांचं नातं बघून रागदेखील येतो.
सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मेहुणी आणि भावोजींची मैत्री बघून नवरी भडकल्याचं दिसत आहे. तिने रागाच्या भरात स्टेजवरच आपल्या नवऱ्याला कानाखाली मारल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हीही विचारात पडाल. तुम्हाला हसू आवरता येणार नाही. हा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.व्हिडिओमध्ये दिसत आहे की, नवरदेव स्टेजवर बसलेला आहे. नवरी त्याच्या बाजूला बसली आहे. त्याचवेळी नवरीची बहिण स्टेजवर येते आणि नवऱ्याच्या बाजूला बसायला जाते.
ही मेहुणी तिच्या भावोजींसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत आहे. नवरदेवही सेल्फीसाठी उत्साह दाखवत आहे. हे बघून नवरीला खूप राग येतो. ती स्टेजवर सगळ्यांच्या समोर आपल्या नवऱ्याच्या कानाखाली मारते. तसेच ती आपल्या नवऱ्याला चांगलंच सुनावते. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ rd_love_status_01 नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले आहे की, तुझं वागणं सुधारलं नाही, तर ती तुला नक्की धडा शिकवून सुधारेल. आणखी एकाने लिहिले आहे की, ही बाब आता दिल्लीपर्यंत जाईल. संसदेच्या विशेष सत्रामध्ये याविषयी चर्चा होईल. वेळ पडली तर सदनाला घेराव घातला जाईल. आणखी एकाने लिहिले की मुलीने जे केलं ते योग्यच होतं. एकाने लिहिले की नवरी आपल्या नवऱ्याच्या बाबतीत जरा जास्तच पझेसिव्ह आहे. अन्य एकाने लिहिले आहे की, लग्नाच्या दिवशीच बायको थोबाडित मारतेय म्हणजे पुढचं आयुष्य एकदम भारी जाणार आहे. बायको अशीच असायला हवी. अनेकांनी या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काही नेटकऱ्यांनी स्माईलीचे इमोजी शेअर केले आहेत. सोशल मीडियावर या व्हिडिओची चांगलीच चर्चा सुरु आहे.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






