नंदुरबार :- जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील बोरपाडा धरणात जिवलग मैत्रिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.यामध्ये बेडकी येथील दोन 16 वर्षीय युवतींचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कशी घडली घटना?
बेडकी येथील उज्वला जयंत्या गावित (वय 16) व मिखा सानु गावित (वय 16) दोन्ही मैत्रिणी गावालगतच्या बोरपाडा धरणाच्या किनारी आंघोळीला गेल्या होत्या. बोरपाडा धरणाच्या किनारी दगडावर बसुन आंघोळ करीत असताना उज्वला गावित व मिखा गावित यांचा पाय घसरून धरणातील खोल पाण्यात पडल्या. परिसरात कोणीही नसल्याने त्यांना मदत मिळून शकली नाही व त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व मुलींच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी दोन्ही मुलींचे मृतदेह धरणाच्या पाण्यात बुडालेल्या अवस्थेत मिळून आले.घटनास्थळी विसरवाडी पोलीस दाखल झाल्यानंतर पंचनामा करून मृतदेह विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. मयत मिखा गावित हिच्या पश्चात आई-वडील एक भाऊ असा परिवार आहे. तर मयत उज्वला गावित हिच्या पश्चात आई वडील चार बहिणी असा परिवार आहे. सदर घटनेत दोन्ही जिवलग मैत्रिणींचा दुर्दैवी जीव गेल्यामुळे बेडकी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






