पनवेल: शारीरिक संबंधांवरील अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर एका भावा-बहिणीने देखील त्याच स्वरूपाचं कृत्य केल्याची धक्कादायक घटना ही समोर आली आहे.ही घटना पनवेलमध्ये घडली असून एका अल्पवयीन भावा-बहिणीच्या शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे.
नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, या सगळ्या प्रकरणात हादरवून टाकणारी घटना म्हणजे भावापासूनच अल्पवयीन बहिण ही गरोदर राहिली आहे. त्यामुळे आता पोलिसांनी अल्पवयीन भावाविरुद्ध देखील गुन्हा दाखल केला आहे. पनवेलमध्ये राहणारे अल्पवयीन भाऊ-बहिणीने शारीरिक संबंधांवर आधारित व्हिडिओ पाहून अशा प्रकारचं कृत्य केलं आहे.अशा स्वरुपाचे व्हिडिओ पाहिल्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. काही दिवसांनी अल्पवयीन मुलीच्या अचानक पोटात दुखू लागलं. त्यामुळे तिला वाशीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी ही मुलगी तीन महिन्यांची गरोदर असल्याचे दिसून आले.
त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस केला. अशी माहिती पोलिसांना दिली.ही घटना पनवेल हद्दीत घडल्याने वाशी पोलिस ठाण्यात बलात्कार आणि पोक्सो कायद्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे हे प्रकरण आता खंडेश्वर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर नोव्हेंबर 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत हा संपूर्ण प्रकार झाला असल्याचं समोर आलं. त्यामुळे असून पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. मात्र आरोपी मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला आहे.
हे पण वाचा
- चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांची पंढरपूर वारी सायकलीने.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- एरंडोल येथील उड्डाणपुलाजवळ रस्त्यात खड्डा पडल्याने अडकत आहेत अनेक वाहन; सदर खड्डा कोण बुजवणार मोठा प्रश्न ?
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.