चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील दोन युवकांचा दारू सोडण्याचे औषध घेतल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. हेच औषध घेतलेल्या दोघांची प्रकृती गंभीर आहे. सहयोग सदाशिव जीवतोडे (वय 19), प्रतीक घनश्याम दडमल (वय 26) अशी मृतकांची नावे आहेत. सदाशिव पुंजाराम जीवतोडे (वय 45) व सोमेश्वर उद्धव वाकडे (वय 35) या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलिसांनी आरोपी महाराजाला ताब्यात घेतलं आहे. सहयोग सदाशिव जीवतोडे व प्रतीक घनश्याम दडमल हे गुळगावमधील दोन तरुण वर्धा जिल्ह्यातील शेडगावमध्ये दारू सोडवण्याचा दावा करणाऱ्या महाराजांकडे गेले होते. त्यांनी काल (21 मे) औषध घेतले होते. दारु सोडवण्यासाठी दिलेलं औषध प्राशन केल्यानंतर काल रात्री उशिरा त्या दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा भद्रावती पोलिस तपास करत आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






