रांची (झारखंड): लग्न करायला निघालेल्या प्रेमी युगुलाचा प्रवासादरम्यान भीषण अपघात झाला असून, दोघांचाही जागीच मृत्यू झाला. रांची चाईबास येथील मुख्य मार्गावर NH 75 येथे रविवारी (ता. २४) दुपारी भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली.
ट्रकने तीन जणांना उडवले आहे.
अपघातात प्रेमी युगुलाचा जागीच मृत्यू झाला तर एक व्यक्ती जखमी झाला आहे. स्थानिकांनी ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. इटीहास गावातील डुई कसाई गावात राहणार रमेश केराई आणि नरसिंह केराई हे दोघे कुलाबुरु गावात आले होते. रमेश आपल्या प्रेयसीला लग्न करायला घेऊन जाणार होता. नरसिंह दुचाकी चालवत होता. तर रमेश आणि त्याची प्रेयसी मागे बसले होते. ट्रिपलसीटने हे तिघेही जात असताना ट्रकने धडक दिली.
NH 75 वरील एका वळणावरुन दुचाकी जात असता समोरून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला उडवले. ट्रकच्या चाकाखाली दुचाकी आली आणि प्रियकर रमेश आणि त्याच्या प्रेयसीचा मृत्यू झाला. सामाजिक कार्यकर्ते सिकंदर जमुदा यांनी या घटनेची माहिती चाईबासा मोफसिल पोलीस ठाणे आणि चक्रधरपूर पोलिसांना दिली.दरम्यान, मुफसिल पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतले आणि चौकशी केली. पोलिसांच्या ताब्यात आलेला ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालवत होता, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. खरसावनचे आमदार दशरथ गगराई यांनी पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. लग्नापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे पण वाचा
- एरंडोल बसस्थानकावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य; आगार व्यवस्थापकांचे बस स्थानकाच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष.
- पाऊले चालती पंढरीची वाट-चांदसर पायीदिंडीचे एरंडोलला स्वागत स्व. जयवीरबापू पाटील स्मृतीप्रित्यर्थ -गटसचिव संघटना 18 वर्षांपासून करीत आहे अन्नदान.
- “पैसेही गेले आणि बायकोही गेली पुन्हा मी एकटाच”… तीन लाख देऊन आणलेली बायको निघाली एका मुलीची आई; दोन दिवसांत टोळीचा भांडाफोड.
- मेट्रो स्टेशनखाली वडिलांजवळ झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीचा एन्काउंटर .VIDEO
- तरुणाचे एकीशी प्रेमसंबंध, तिचं दुसऱ्याशी लग्न ठरलं, तरुण गेला जाब विचारण्यास , तेथे झाला वाद पळून घरी येताना तरूणाचा खून करून तो अपघात असल्याचा केला बनाव.