रांची :- अनैतिक संबंध, प्रेम संबंधमूळे अनेक कांड होतं असतात यातून एकमेकांच्या जीव घेण्या इतपत गुन्हे घडत असतात असचं एक खळबळ उडवून देणारं प्रेम संबंधाचं प्रकरण रांची मधून समोर आलं आहे.एक विवाहित महिला प्रियकरासोबतच खोलीत झोपली होती आणि पतीचा आणि सासूचा घराबाहेर पलंग ठेवला होता यास पतीने विरोध केला असता महिला आणि तिच्या प्रियकराने त्याला बेदम मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.जखमी पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
रांचीतील घाटशिला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पावडा गावात ही घटना घडली आहे. दोघांच्या मारहाणीत पती माणिक गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या मुख्याधिकारी पार्वती मुर्मू यांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी पती माणिकला उचलून उपविभागीय रुग्णालयात नेलं, तर पत्नी सुनीता आणि तिचा प्रियकर ऋषिकेश तंतुबाईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.माणिकने सांगितले की, ‘आमच्या मुलीच्या मृत्यूनंतर कविराज ऋषिकेश वारंवार घरी येऊ लागला. दरम्यान, त्याचे पत्नीसोबत प्रेमसंबंध सुरू झाले.
मी एका टेलरच्या दुकानात काम करतो. याचा फायदा दोघांनी घेण्यास सुरुवात केली. दोघांचे प्रेमप्रकरण इतकं वाढले की ऋषिकेश माझ्याच घरी राहू लागला. त्याला घरातून निघून जाण्यास सांगितलं असता त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. शिवाय, माझी पत्नीही त्याला साथ देऊ लागली. मी आईसोबत घराबाहेर झोपायचो आणि ऋषिकेश माझ्या पत्नीसोबत खोलीत झोपायचा. दोघांना रंगेहात पकडलं असता ऋषिकेश आणि सुनिता यांनी मला बेदम मारहाण केली.दरम्यान, माणिक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपविभागीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






