पाटणा (बिहार) : एक विवाहित महिला नवऱ्याला सोडून प्रियकराकडे निघून गेल्यानंतर नवऱ्याने दुसरा विवाह केला. नवऱ्याने दुसरा विवाह केल्याचे समजताच पहिली पत्नी परत आली आणि पोटगीची मागणी करू लागली आहे.बिहारमधली एक विवाहित आणि दोन मुलांची आई असलेली महिला ऑनलाइन ल्युडो खेळत असताना गेम पार्टनरच्या प्रेमात पडली आणि पतीला सोडून प्रियकराकडे निघून गेली. पतीनेदेखील पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरा विवाह केला. प्रियकराकडून परत आलेल्या पत्नीने पतीकडे पोटगी मागितली आहे. पती-पत्नीच्या या प्रकरणाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
भागलपूर जिल्ह्याच्या नवगछिया भागात दोन मुलांची आई असलेली महिला ऑनलाइन ल्युडो गेम खेळत असताना एका युवकाच्या प्रेमात पडली. ती युवकाच्या प्रेमात अक्षरशः वेडी झाली आणि पतीला सोडून युवकाकडे आली. प्रेमापुढे ती तिच्या मुलांनादेखील विसरली. प्रियकराच्या सांगण्यावरून ती त्याच्या उत्तर प्रदेशातल्या घरी पोहोचली. महिलेच्या पतीने तिला घटस्फोट न देता दुसरा विवाह केला. जेव्हा पहिल्या पत्नीला ही गोष्ट कळाली तेव्हा ती प्रियकराला सोडून थेट सासरी पोहोचली आणि तिने पोटगीची मागणी केली.
या प्रकरणी पत्नी पूजा कुमारीने सांगितले, ‘माझा विवाह 2017-18मध्ये बलहा इथल्या गौतम कुमारशी झाला आहे. ऑनलाइन ल्युडो खेळत असताना मी माझ्या प्रियकराकडे पळून गेले ही माझी चूक आहे. तो यूपीचा असून त्याचे नाव विनोद आहे. माझ्यासोबत घटस्फोट न घेता गौतम कुमारने दुसरा विवाह केला आहे. माझ्या पतीने लपून दुसरा विवाह केला त्यावर माझा आक्षेप नाही. तो मला त्याच्यासोबत राहू देणार असेल तर माझी हरकत नाही; पण जर तो मला त्याच्यासोबत राहू देणार नसेल तर त्याने माझ्यासह मुलांचा खर्च उचलावा, ही माझी मागणी आहे. कारण मला अनेक आजार आहेत, त्यामुळे त्याने दिलेल्या पैशांतून मी माझं पालनपोषण करू शकेन.’पती गौतम कुमारने पहिल्या पत्नीला सोबत राहण्यास नकार दिला आहे.
तो म्हणाला, ‘घरी नसताना ती घरातून पळून गेली. ही माहिती मिळताच मी तिच्या शोधात सुरतला गेलो; पण ती सापडली नाही. मग मी हैदराबादला मजुरी करायला गेलो. दोन महिन्यांनंतर पत्नी माहेरून परतली. तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी मला कॉल करून तिची चूक झाली असे सांगितले. हे ऐकून मी पत्नीला माफ केलं; पण पूजा तिच्या ऑनलाइन गेम फ्रेंडसोबत यूपीत राहून परत आली आहे, हे समजल्यावर या महिन्यात 17 तारखेला दुसरा विवाह केला. मी आता पूजा कुमारीला माझ्यासोबत राहू देणार नाही.’
हे पण वाचा
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……