हूबळी (कर्नाटक): कर्नाटकात नेहा हिरेमठ हत्या प्रकरणानंतर आणखी एका युवतीची प्रेम प्रकरणातून चाकूने भोसकून हत्या झाल्यानं खळबळ उडाली आहे. बेंडिगेरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत वीरपुरा ओनी भागात ही घटना घडली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.अंजली अंबीगेरा (वय २१) असे हत्या झालेल्या युवतीचे नाव आहे. तर खून करणाऱ्या युवकाचे नाव विश्वा असून त्याला गिरीश नावानेही ओळखलं जाते. गिरीशने एकतर्फी प्रेमातून अंजलीची हत्या केली आहे. तो तिला ब्लॅकमेल करत होता. तुझंही हाल नेहा हिरेमठ सारखं होईल अशी धमकी त्याने दिली होती.
आई वडिलांना न सांगता म्हैसूरला जाण्यासाठी तो दबाव टाकत होता,अशी माहिती समोर येत आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आज (बुधवार) सकाळी साडेपाच वाजता मुलीच्या घरात घुसला आणि झोपेतच तिच्यावर हल्ला केला. युवतीच्या कुटुंबियांनी युवकाला (वय २३) रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतरही त्याने चाकूने वार केले आणि पळून गेला. हत्या झालेल्या मुलीच्या दोन बहिणी आणि आजी घटनास्थळी होती. त्यांच्यासमोरच युवकाने तिला भोसकले. घरात तिला फरफटत नेलं आणि लाथाबुक्क्यांनी मारलं. त्यानंतर स्वयंपाक घरात ढकलून तिला चाकूने हल्ला केला.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






