Video:नवी दिल्ली : अंत्यसंस्कारावेळी अग्नी दिला अन् मृतदेह चितेवरच उभा राहिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.अंत्यसंस्कारासारखा वाटणारा हा एक आश्चर्यकारक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. जो पाहिल्यावर सर्वांना धक्का बसला आहे. एक मृतदेह ज्याच्यावर अंत्यसंस्कार होत आहेत. एक व्यक्ती चितेवर आहे. चितेला अग्नी देण्यात आला आणि त्याचवेळी मृतदेह चितेवर उठून बसला.
त्यानंतर चितेवर उभा राहून तो पळू लागला. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित लोकांना घाम फुटला. संबंधित दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला.व्हिडीओत पाहायला मिळते की, अंत्यसंस्कारासाठी नागरिकांची गर्दी जमली आहे. तिथं लाकूड पेटवेले आहेत, जे चितेसारखं दिसतं आहे. त्यावर एक व्यक्ती बसलेली आहे. ती चितेवरून उठते आणि पळताना दिसते. चितेवरील व्यक्ती जणू मृतदेहच आहे आणि ती जिवंत झाली असे वाटते. पण व्हिडीओ तुम्ही नीट पाहिला तर या व्यक्तीच्या अंगावर कपडे आहेत.
हिंदू प्रथेनुसार मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करताना त्याच्यावर कफन घातले जाते, बाकी त्याच्या अंगावर कोणतेही कपडे नसतात. पण या व्हिडीओत मात्र या व्यक्तीने कपडे घातलेले आहेत.दरम्यान, संबंधित व्हिडीओ फक्त व्हायरल व्हिडीओ म्हणून दाखवण्यात आला की खरंच घटना घडली आहे. व्हिडीओचं नेमकं सत्य काय? त्याबाबत अधिकृत माहिती हाती आलेली नाही.
हे पण वाचा
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.
- राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.गिरीष महाजन यांचा शिक्षक समन्वय संघ जळगाव,च्या वतीने आभार पर सत्कार.
- रस्त्याने जाणाऱ्या महिलेला भररस्त्यात गाठून माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव नाही तर ठार मारेन; धमकी देणाऱ्या आरोपीला 24 तासाच्या आत अटक.
- निवासी शाळेतून मुलीचा शाळेचा दाखला काढण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्थाचालक व त्यांच्या पत्नीने केलेल्या मारहाणीत मृत्यू.
- अल्पवयीन मुलीशी केली मैत्री,फूस लावून बसविले एक्स्प्रेसमध्ये अन् धावत्या रेल्वेत टॉयलेटमध्ये नेऊन नराधमाने केला लैंगिक अत्याचार.