पाटना (बिहार): गोपालगंजमध्ये एका प्रेमी युगलाची हत्या करण्यात आली असून, दोघांचे मृतदेह एकाच खोलीत सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. भोरे क्षेत्रातल्या कल्याणपूर गावात ही घटना घडली. प्रेयसीचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता, तर प्रियकराचा गळा दाबून हत्या करण्यात आली होती.पोलिस पुढील तपास करत आहेत.कल्याणपूर गावातील मंटू सिंह आणि त्यांच्या शेजारी राहात असलेले पुष्पा कुमारी यांचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोन वर्षांपूर्वी ती दोघे घर सोडून पळून गेले होते. मात्र कुटुंबीयांच्या दबावामुळे त्या दोघांनाही परत यावं लागलं होते.
2022मध्ये पुष्पाचे लग्न तिच्या कुटुंबीयांनी दुसऱ्या युवकासोबत लावून दिले होते. लग्नानंतर माहेरी आलेली पुष्पा पुन्हा एकदा आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती. दोघेही लखनौ येथे राहात होते. दरम्यान, मंटूचा विवाह अन्य कोणा मुलीशी लावण्यासंदर्भात त्याच्या कुटुंबीयांनी तयारी सुरू केली. पुष्पावर अत्याचार होऊ लागल्यानंतर पुष्पाने गोपालगंज महिला ठाण्यात हुंड्यासाठी छळ होत असल्याची तक्रार दाखल केली होती.दरम्यान, चार महिन्यांपूर्वी मंटूला महिला ठाण्याच्या पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले होते.
काही दिवसांपूर्वीच मंटू तुरुंगातून सुटून आला आणि थेट आपल्या घरी गेला, जिथे पुष्पा राहत होती. गुरुवारी (ता. 21) दुपारपर्यंत त्यांच्या घराचा दरवाजा उघडला नाही, त्यामुळे आजूबाजूच्या शेजाऱ्यांना शंका आली. डोकावून पाहिले असता त्यांना दोघांचे मृतदेह दिसले.मंटूचे कुटुंबीय पुष्पाच्या कुटुंबीयांवर हत्येचा आरोप करत आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून, पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.