कटिहार : बिहारमधील कटिहारमध्ये यशोदादेवी नावाच्या एका शिक्षिकेची निर्घृण हत्या झाली. या घटनेनंतर 100 तास उलटून गेले तरी पोलिसांच्या हाती काहीही पुरावा लागलेला नाही. तिच्या खुनाचा आरोप असलेला हलचल राय नामक तिचा कथित प्रियकर सोशल मिडियावर ॲक्टिव्ह आहे, मात्र पोलीस अद्याप त्याच्यापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत.त्याहून धक्कादायक बाब म्हणजे मंगळवारी कथित प्रेयसीची हत्या केल्यानंतर बुधवारीच ती पत्नी असल्याचं सांगून तिचं श्राद्धकर्म करत असतानाची पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. पोस्टसोबत जोडलेल्या व्हिडिओमध्ये पुरोहित मंत्रपठण करत आहेत.
ते पत्नीचं नाव घेण्यास सांगतात तेव्हा हलचल राय हा यशोदादेवी हिचं नाव घेऊन हे श्राद्धकर्म करत असल्याचं या पोस्टमध्ये स्पष्ट दिसत आहे. त्याने शेअर केलेला व्हिडिओ 57 सेकंदांचा असून व्हिडिओमध्ये त्याने मुंडन केल्याचंही स्पष्ट दिसत आहे. हा आरोपी सोशल मीडियावर दिसत असूनही पोलिसांच्या हाती लागत नाही हे विशेष आहे.प्राणपूर परिसरातील पकरिया प्राथमिक शाळेतील शिक्षिका यशोदादेवी हिच्याशी असलेल्या प्रेमसंबंधात वितुष्ट आल्यामुळे हलचल राय याने सुऱ्याने भोसकून तिची हत्या केली. यशोदा शाळेत जात असताना हलचलने तिच्यावर हल्ला केला त्यानंतर रॉकेल टाकून तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्नही त्याने केला.
हा आरोपी अद्याप फरार आहे.आरोपीचे वडिल किशन राय यांनी 20 मे रोजी प्राणपूर पोलिस ठाण्यात हलचल राय याच्या विरुद्ध अर्ज दिला होता. आपला मुलगा हलचल हा त्याची पत्नी यशोदादेवी हिला जीवे मारण्याची धमकी देतो आणि आपला आपल्या मुलाशी कोणतंही नातं उरलेलं नाही, असं किशन राय यांनी आपल्या अर्जात म्हटलं होतं. तो हैदराबादहून कधी आला माहिती नाही मात्र ग्रामस्थांनी त्याला पाहिलं होतं. पोलीस अधिकारी रंजित कुमार यांनीही किशन राय यांनी अशा प्रकारची माहिती आधीच पोलिसांना दिल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. मात्र, पोलिसांनी या प्रकरणात जे म्हटलंय ते धक्कादायक आहे. किशन राय यांचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर पोलिस त्यांच्या घरी पोहोचले. हलचल त्यांना सापडला नाही.
किशन राय यांना मुलगा कुठे आहे हे माहिती असूनही त्यांनी त्याचं लोकेशन पोलिसांना कळू दिलं नाही आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी हे कृत्य केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.दोन वर्षांपूर्वी हलचल राय याने यशोदादेवीच्या पतीवर जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर यशोदाने त्याच्याशी प्रेमसंबंध तोडले होते. त्यामुळे त्याने तिलाही ठार मारण्याची धमकी दिली होती. 20 मे ला तो हैदराबादहून आला. 21 ला यशोदा हिचा खून केला आणि 22 ला श्राद्ध करत असल्याचा व्हिडिओ शेअरही केला. प्राणपूर आणि कटिहार परिसरातील नागरिकांमध्ये हा होत आहे. एसडीपीओ अभिजीत कुमार म्हणाले, हलचल रायवर, त्याच्या व्हायरल व्हिडिओवर पोलिसांची नजर असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल.
हे पण वाचा
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.
- राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.गिरीष महाजन यांचा शिक्षक समन्वय संघ जळगाव,च्या वतीने आभार पर सत्कार.
- रस्त्याने जाणाऱ्या महिलेला भररस्त्यात गाठून माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव नाही तर ठार मारेन; धमकी देणाऱ्या आरोपीला 24 तासाच्या आत अटक.
- निवासी शाळेतून मुलीचा शाळेचा दाखला काढण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्थाचालक व त्यांच्या पत्नीने केलेल्या मारहाणीत मृत्यू.
- अल्पवयीन मुलीशी केली मैत्री,फूस लावून बसविले एक्स्प्रेसमध्ये अन् धावत्या रेल्वेत टॉयलेटमध्ये नेऊन नराधमाने केला लैंगिक अत्याचार.