नवी दिल्ली : अनेक प्रयत्न करूनही प्रामाणिकला आज ऑफिसचं काम करावंसं वाटत नव्हतं. कारण काल रात्री बायकोशी झालेला वाद त्याला आठवत होता. अशातच प्रामाणिकचा अर्धा दिवस निघून गेला. इतक्यात प्रामाणिकचा मोबाईल वाजला.त्याने फोन उचलला तेव्हा त्याला दिसलं, तो त्याच्या पत्नीचा फोन आला आहे. मोबाईलवर बायकोचं नाव पाहून प्रामाणिकच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.त्याला वाटलं, की कदाचित आपल्या पत्नीला तिची चूक कळली असेल आणि तिने माफी मागायला फोन केला असेल.
या आशेने त्याने फोन उचलला आणि हॅलो बोलला. मात्र तिकडून बायको असं काही बोलली की, प्रामाणिकचा चेहरा पडला आणि त्याच्या कपाळावरून घाम टपकू लागला. त्याने आधी मुलाच्या शाळेकडे धाव घेतली आणि तिथून मुलाला घरी नेलं. घरातील दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.यानंतर त्याने थेट पोलिसात धाव घेतली. प्रामाणिकने पोलिसांना सांगितलं की, काल रात्री तो घरी पोहोचला तेव्हा त्याची पत्नी फोनवर कोणाशी तरी बोलत होती. हे पाहताच पत्नीने फोन कट केला. प्रामाणिकने पत्नीला कोणाशी बोलते असं विचारलं असता, या प्रश्नावर पत्नी संतापली.
आणि, काही काळानंतर, या नाराजीचं रूपांतर पती-पत्नीमधील भांडणात झालं.या वादादरम्यान त्याच्या पत्नीने खुलासा केला की, ती तरुण नावाच्या मुलाशी बोलत होती आणि ती त्याला लग्नापूर्वीच ओळखत होती. हे ऐकून प्रामाणिक तिथून निघून गेला आणि बायकोने बोललेले शब्द त्याला पुन्हा पुन्हा आठवू लागले. आपल्या बायकोने रागाच्या भरात हे बोललं असावं असं प्रामाणिकला अजूनही वाटत होतं. दुसऱ्या दिवशी तो नेहमीप्रमाणे सकाळी तयार होऊन ऑफिसला गेला.सकाळी अकराच्या सुमारास तो ऑफिसमध्ये काम करत असताना त्याच्या पत्नीने फोन करून सांगितलं, की ती जात आहे. एवढंच सांगून तिने फोन कट केला.
प्रामाणिकने पत्नीच्या नंबरवर पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न केला असता तो बंद होता. काही वेळाने त्याला तरुण नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने फोन उचलला तर पलीकडून त्याच्या बायकोचा आवाज आला. प्रामाणिक काही बोलायच्या आधीच त्याच्या बायकोने सांगितलं, की ती तरुणाला लग्नाआधीपासून ओळखते आणि तिचं त्याच्यावर प्रेम आहे.मी आता तरुणासोबत जात आहे, तू शाळेत जाऊन मुलाला घेऊन ये, असं त्याच्या पत्नीने फोनवर सांगितलं असल्याचं प्रामाणिकने पोलिसांना सांगितलं. यानंतर तरुणाचा मोबाईलही बंद झाला. दरम्यान, प्रामाणिकच्या तक्रारीवरून सायबराबाद जिल्ह्यातील शमशाबाद पोलिसांनी एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
हे पण वाचा
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.