Viral video: चोरी करताना चोरटे अगदी नियोजन आखून चोरी करतात, असे म्हटले जाते. कारण- चोरी करताना तो पकडला जाण्याची त्याला भीती असते. तसे झाल्यास आधी सार्वजनिक ठिकाणी असलेले लोक चोराला पकडून मारतात आणि मग पोलिसांच्या ताब्यात देतात.आज सोशल मीडियावरसुद्धा असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. एका बस चालकाच्या हुशारीमुळे चोरांना पकडायला मदत झालीय. बस चालकाची चोराला पकडण्याची फिल्मी स्टाईल पाहून तुम्हीसुद्धा चकित व्हाल.
याचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओज पाहायला मिळतात, जे आश्चर्यकारक असतात. तर काही व्हिडीओ हे मनोरंजक असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जे पाहून तुम्ही त्या व्यक्तीचं कौतुक केल्याशिवाय राहाणार नाही.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन चोर गाडीवरुन आले आणि एका महिलेच्या गळ्यातील चैन खेचण्याचा प्रयत्न करत होते. याचवेळी त्याचा एक सहकारी गाडीवर उभा आहे, चोरी करुन पळून जाण्याच्या प्लॅनमध्ये चोरटे होते.
मात्र त्यांचा हा प्लॅन बस चालकानं हाणून पाडला. बस चालकाच्या लांबूनच हा सगळा प्रकार लक्षात येताच त्यानं थेट बस या चोरट्यांच्या अंगावर घातली. यामध्ये हो दोघेही चोर गाडीसकट खाली पडले आणि पळू लागले, यावेळी आजूबाजूचे लोक त्यांना पकडण्यासाठी त्यांच्या मागे पळाले. बस चालकाच्या हुशारीमुळे चोरांचा हा डाव फसलेला पाहायला मिळाला.
फिल्मी स्टाईलमध्ये पकडले चोराला
चित्रपटात अनेकदा आपण पाहिले असेल की, चोराला पकडण्यासाठी हीरो जीवाचे रान करतो तो उंच इमारती किंवा गाड्यांवरून उड्या घेऊन चोराला पकडतो. असंच काहीसं या व्हिडीओतसुद्धा पाहायला मिळालं आहे. या बसचालकाने एकदम फिल्मी स्टाईलनं या चोराला पडकण्यासाठी प्रयत्न केला. बस चालकाने चोराला पकडण्यासाठी दाखवलेली हिंमत अगदीच कौतुकास्पद आहे.सोशल मीडियावरही हा व्हिडीओ @roberyfail या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून अनेक जण बस चालकाच्या हिमतीचं कौतुक करीत आहेत.
हे पण वाचा
- मतदार संघातील जनतेचे भक्कम समर्थन हेच माझे खरे बळ :-डॉ.संभाजीराजे पाटील
- धरणगावातील, म्हसावद व बोरणार येथील प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश ;म्हसावद व बोरणार येथे ऊ.बा. ठा. गटाला मोठा धक्का
- गुलाबराव पाटील येणून जास्तीत जास्त “मतेशी जीकान लायर “- बंजारा तांडा वासियांचा निर्धार !
- भीषण अपघात! बस दरीत कोसळून 36 प्रवाशांचा मृत्यू; प्रवाशांनी खिडकीतून उडी घेण्याचा प्रयत्न केला, पण…’ पहा व्हिडिओ
- गुलाब भाऊंचा विजयच आमच्यासाठी खऱ्या भाऊबीजेची भेट’! विदगाव – फुपणी परिसरातील लाडक्या बहिणींचे भावनोद्गार !