कोकर (झारखंड) :- मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे चार तरुणांनी लष्करातील जवानाच्या पत्नीला आपल्या वासनेची शिकार बनवली. एक आरोपी आधीपासूनच पीडितेच्या घरात लपून बसला होता. रात्री जवानाची पत्नी आपल्या दोन लहान मुलांसोबत झोपली होती.अचानक१२ वाजतातिला खोलीत चार तरुण दिसले. त्यांनी पीडितेच्या मुलांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यांनी म्हटले की, काही दिवसापूर्वी तुझी बहिणही येथे आली होती. आम्ही तिच्यासोबतही असे करू शकलो असतो. मात्र आम्हाला तुझा हिशोब चुकता करायचा होता. त्यानंतर त्यांनी पीडितेवर गँगरेप केला. पीडितेचा पती लडाखमध्ये तैनात आहे. पोलिसांनी चार तरुणांना अटक केली आहे.
गँगरेप करून मोबाईल तोडला –
पीड़िता कोकर येथे भाड्याच्या घरात राहते. खरसीदागमध्ये ते घर बांधत आहेत. सोमवारी रात्री ८ वाजता ती पाणी घेण्यासाठी बाहेर आली असता एक तरुण तिच्या घरात शिरला व लपून बसला. रात्री जेवण झाल्यानंतर ती दरवाजा बंद करून झोपली. रात्री १२ वाजता अचानक घराचा दरवाजा उघडल्यानंतर तिला जाग आली. तिच्या खोलीत चार तरुण उभे होते. त्यांनी तीन महिन्याची मुलगी व सहा वर्षाच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सकाळी त्यांनी पीडितेचा मोबाईल तोडला व धमकी देऊन पसार झाले.
घरा बांधताना तरुणांसोबत झाला होता वाद –
सांगितले जात आहे की, पीडितेने जमीन खरेदी केल्यानंतर बोरिंग करणे आणि घर बांधताना स्थानिक तरुणांशी तिचा वाद झाला होता. तरुणांचे म्हणणे होते की, बोरिंग करणे तसेच घर बांधण्याचा ठेका त्यांना दिला जावा, कारण ते स्थानिक आहेत. वाद वाढल्यानंतर पीडितेच्या पतीने स्थानिक तरुणांना घर बांधण्याचा ठेका दिला. मात्र घर बांधताना पिलर वाकडा तिकडा केल्याने जवानाने त्यांचे काम काढून ठेका दुसऱ्या ठेकेदाराला दिला.
तुझ्याशी हिशोब चुकता करायचा होता –
या घटनेनंतर तरुणांनी जवानासोबत खूप वाद घातला होता. पीड़ितनेने सांगितले की, रात्री बलात्कार करताना सर्व आरोपी रागात होते. आरोपींनी तिला म्हटले की, काही दिवसापूर्वी तुझी बहिण येथे रहात होते. तिचेही हाल आम्ही असेच करू शकलो असतो. मात्र आम्हाला तुझा हिशोब चुकता करायचा होता. यामुळे आम्ही तिला सोडले. पीडितेने सांगितले की, काही दिवसापूर्वी तिची लहान बहिणही या घरात रहायला आली होती.घटनेनंतर सकाळी पीडितेच्या पहिणीने तिला फोन केला, मात्र फोन लागला नाही. त्यानंतर तिने शेजारच्यांना फोन करून घरी जाण्यास सांगितले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे.
हे पण वाचा
- गावा- गावात गुलाबभाऊंच्या भगव्या वादळाची तुफान लाट;१२ दिवसांत १२१ गावांत शिवसेनेच्या धनुष्याचा डोर- टू – डोर जयघोष
- डॉ.संभाजीराजे पाटील यांचा वाढत्या प्रतिसादेला जनतेचा भक्कम पाठिंबा
- अपक्ष उमेदवार डॉ हर्षल मानेच्या प्रचारात सौभाग्यवतींनी घेतली प्रचारात आघाडी; गावोगावी महिला औक्षण करुन देत आहे विजयी होण्याच्या आशीर्वाद.
- गुलाबभाऊंच्या “धनुष्यबाणाला” प्रचंड मतांनी विजयी करा, माजी सभापती ललिताताई कोळी यांचे आवाहन
- अमळनेर येथे दुचाकीवरून साडे तीन किलो गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केले जेरबंद, १ लाख ३८ हजाराचा मुद्देमाल जप्त.