Viral Video: सोशल मीडियावर अनेक रील्स व्हायरल होत असतात. काही गाणी नेटकऱ्यांना वेड लावतात. ‘गुलाबी साडी’ हे त्यापैकीच एक मराठी गाणं. या गाण्यावरचे व्हिडिओ तुफान व्हायरल झाले. अगदी मराठी ते अगदी बॉलिवूड, हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकरांनीही यावर रील बनवलं. खरंतर आता हे जुनं झालं पण ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील बबिता म्हणजे अभिनेत्री मुनमुन दत्ताने (Munmun Dutta) आता यावर रील बनवलं आहे.
लेट पण थेट असा व्हिडिओ तिने केला आहे.गुलाबी साडी आणि त्यावर काळ्या रंगाची डिझाईन असा मुनमुन दत्ताचा लुक आहे. तिने गुलाबी रंगाचेच कानातलेही घातले आहेत. बॅकग्राऊंडला ‘गुलाबी साडी’ हे व्हायरल मराठी गाणं लावून तिने डान्स केला आहे. यात बबिताजींच्या अदा दिसून येत आहेत. बबिताचे चाहते व्हिडिओ पाहून पुन्हा एकदा फिदा झालेत.नेटकऱ्यांनीही बबिताजींच्या रीलवर भन्नाट कमेंट केल्या आहेत.
‘खूप उशीर झाला’ असं म्हणत एकाने तिची चेष्टा केली आहे. तर एका चाहत्याने लिहिले, ‘गुलाबी साडी योग्य ठिकाणी पोहोचली’.मुनमुन दत्ता गेल्या १४ वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत काम करत आहे. जेठालालचं तिच्यावर असलेलं छुपं प्रेम सर्वांनाच ठाऊक आहे. तसंच मुनमुनच्या बोल्ड, हॉट फिगरवर चाहते फिदा आहेत.
हे पण वाचा
- मतदार संघातील जनतेचे भक्कम समर्थन हेच माझे खरे बळ :-डॉ.संभाजीराजे पाटील
- धरणगावातील, म्हसावद व बोरणार येथील प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश ;म्हसावद व बोरणार येथे ऊ.बा. ठा. गटाला मोठा धक्का
- गुलाबराव पाटील येणून जास्तीत जास्त “मतेशी जीकान लायर “- बंजारा तांडा वासियांचा निर्धार !
- भीषण अपघात! बस दरीत कोसळून 36 प्रवाशांचा मृत्यू; प्रवाशांनी खिडकीतून उडी घेण्याचा प्रयत्न केला, पण…’ पहा व्हिडिओ
- गुलाब भाऊंचा विजयच आमच्यासाठी खऱ्या भाऊबीजेची भेट’! विदगाव – फुपणी परिसरातील लाडक्या बहिणींचे भावनोद्गार !