दौंड :- तालुक्यातील जिरेगाव येथील एका विवाहित महिलेने सासू आणि नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ही माहिती दौंड पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली. दरम्यान, ही महिला मागील दोन महिन्यापासून बेपत्ता होती. योगिनी संतोष जाधव (वय 19 , जाधववस्ती, जिरेगांव ता-दौंड जि-पुणे ) असे या आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून नवरा संतोष बबन जाधव व सासू मंगल बबन जाधव अशी आरोपींची नाव आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, योगीनी हिचे संतोष जाधव याच्यासोबत ६ डिसेंबर २०२३ रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर सासु आणि नवरा तुला स्वयंपाक करता येत नाही, घरातील कामे करता येत नाही, तु माहेरी सारखे फोन करते, तसेच तुझे बाळंतपणासाठी तू तुझ्या वडीलांकडून पैसे आणायचे असे म्हणून वारंवार त्रास देऊन शिवीगाळ करुन मारहाण करीत होते. त्यामुळे ती गरोदर असताना १२ एप्रिल २०२४ रोजी घरातून निघून गेली होती.
याबाबत तिचे पती संतोष याने दौंड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तेव्हांपासून योगीनी ही बेपत्ता होती. मात्र योगीनी हिचा मृतदेह रविवारी (दि. २) जिरेगाव येथील झाडाझुडपात गळपास घेतलेल्या अवस्थेत आढळला. योगिनी हिचे वडील सुभाष आनंदराव चव्हाण यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने नवरा आणि सासूच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक डोके यांनी दिली.
हे पण वाचा
- मोयखेडा दिगरला घरकुल नाही तर कुळघर/ घरकुल योजनेचा फज्जा; गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून सुद्धा समितीचा चौकशीकडे कानाडोळा.
- प्रवीण गायकवाडांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ एरंडोल येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे निवेदन
- जबरी चोरीप्रकरणी चौघांना अटक; ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भडगांव पोलिसांची कारवाई.
- एरंडोलला ट्रॅक्टरची चोरी,चोरटे फरार, २४ तासाच्या आत दुसरी मोठी घटना, एरंडोल पोलिसांना चोरट्यांना पकडण्याचे आवाहन.
- एरंडोल न.पा.च्या अकार्यक्षम -बेजबाबदार प्रशासना विरूध्द बेमुदत उपोषणदि. 21 जुलै 2025 पासून एरंडोल शहर संघर्ष समिती करणार प्रांत कार्यालयासमोर उपोषण