
झुंजार प्रतिनिधी । पारोळा
पारोळा :- शहराचे आराध्य दैवत प्रती तिरुपती श्री बालाजी महाराज मंदिरात गुढीपाडवा नववर्ष निमित्त छपन्न भोग नवैद्यच्या कार्यक्रमाला भाविकांनी आलोट गर्दी केली होती. तसेच रात्रीच्या सुमधुर भक्ती गीतांच्या स्वरात श्रोते हे कमालीचे तल्लीन झाले होते.

श्री बालाजी संस्थान व व्यंकटेश बालाजी महाप्रसाद समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच गुढीपाडवा या नूतन मराठी नववर्षाच्या निमित्ताने छपन्नभोग हा कार्यक्रम घेण्यात आला. 2 एप्रिल गुढीपाडव्याच्या दिवशी शहरातून जवळपास दोनशे भाविक भक्तांनी स्वयंस्फूर्तीने दिलेला छपन्न भोग चे श्री बालाजी महाराज अभिषेक नंतर दुपारी बारा वाजता मंदिराचे मुख्य विश्वस्त श्रीकांत शिंपी, विश्वस्त डॉ अनिल गुजराथी,दिलीप शिरूडकर यांच्या हस्ते सहपत्नीक विधिवत संकल्प सोडण्यात आला.त्यानंतर भाविकांसाठी भोगदर्शन खुले ठेवण्यात आले होते.
रात्री साडेदहा वाजता शेज आरती करून छपन्न भोगचा गोपाळ काला करण्यात आला. 3 एप्रिल रोजी हा काला मंदिरात प्रसाद स्वरूपात वाटप करण्यात आला.या कार्यक्रमाना भाविकांनी आलोट गर्दी केली होती. विशेषतः महिलांची सर्वाधिक गर्दी होती.परिणामी ही गर्दी पाहून भाविकांना जाणूकाय ब्रह्मउत्सवाची प्रचिती येत होती. या सर्व वैशिष्ट्य पूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी व्यंकटेश महाप्रसाद समितीचे अध्यक्ष तथा माजी खासदार ए टी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऍड दत्ताजी महाजन, प्रकाश शिंपी, दिनेश गुजराथी, विश्वास चौधरी, रमेश भगवती,अमोल वाणी, बापू कुंभार, गुणवंत पाटील, प्रमोद वाणी, गुणवंत चौधरी, सोनू चौधरी, सारीखा शिंपी, ऍड कृतिका आफ्रे सह बालाजी स्वयमसेवक विश्वस्त आदींनी परिश्रम घेतले.
भक्तीगीतात श्रोते तल्लीन
छपन्न भोग कार्यक्रम निमित्ताने गुढीपाडवा च्या दिवशी रात्री 7 ते 10 जळगाव येथील
सौ सुनंदा चौधरी यांचा श्रीहरी भक्ती संगीत मंडळ यांचा सुमधुर वाणीतुन भक्ति गीतांचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात सुनंदा चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गायलेली विविध भक्तिगीते, श्री बालाजी गीता मध्ये उपस्थित श्रोते हे तल्लीन होऊन नाचत होते.