भोपाळ : पत्नीने प्रियकरासह मिळून पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याची घरातील कोणालाच माहिती नव्हती. सकाळी मृतक व्यक्तीची पुतणी टेरेसवर पोहोचली तेव्हा काकांना पाहून तिला धक्का बसला.तिने वडिलांना फोन केला असता तरुणाचा खून झाल्याचं समजलं. यानंतर पोलिसांनी मृताच्या पत्नीची चौकशी केली असता तिने संपूर्ण हकीकत सांगितली. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली असून तिच्या प्रियकराचा शोध सुरू आहे. ही घटना मध्य प्रदेशातील बालाघाट येथून समोर आली आहे.
पत्नीने सांगितलं की, तिने तिचा प्रियकर आणि अन्य एका तरुणासोबत मिळून आपल्या पतीची हत्या केली. मृत हा नगर पंचायतीचा कर्मचारी होता. पोलिसांनी या खुनाच्या प्रकरणाचा पर्दाफाश करून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. प्रकरण बालाघाटमधील कटंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे 2 जून रोजी नगर पंचायत पाणी शाखेचे कर्मचारी पवन नामदेव यांचा मृतदेह घराच्या टेरेसवर आढळून आला होता. मृताच्या मानेजवळ जखमा आढळल्या.1 जून रोजी रात्री जेवण करून पवन नामदेव पत्नी आणि एका पुतणी सोबत झोपले होते. दरम्यान, तो छतावर कधी आणि कसा पोहोचला हे समजू शकलं नाही.
मात्र 2 जून रोजी सकाळी त्यांची 9 वर्षांची पुतणी टेरेसवर गेली असता तिला तिचा काका पवन नामदेव गच्चीवर पडलेला दिसला. याबाबत मुलीने वडिलांना माहिती दिली. कुटुंबीय आले असता पवन नामदेव मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवून तपास सुरू केला. घटनाक्रमानुसार पत्नीची संशयास्पद भूमिका समोर आली. त्यामुळे पोलिसांनी पत्नी सरिता नामदेव हिला ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी हा सगळा प्रकार उघडकीस आला. मृत पवनची पत्नी सरिता हिचे बिहारमधील इम्तियाज आलम या तरुणासोबत फेसबुकवरून प्रेमसंबंध सुरू होते. यानंतर तिने प्रियकर इम्तियाज आलमला कटंगी येथे बोलावले.
कटंगी येथे 8 महिन्यांपासून प्रियकर भाड्याने खोली घेऊन राहत होता. सरिता खोलीचे भाडे देत होती.1 आणि 2 जूनच्या मध्यरात्री सरिताने तिचा प्रियकर इम्तियाज आलम आणि त्याच्या एका मित्राला बोलावून पती पवन नामदेवचा खून केला. पोलिसांनी या हत्येचा पर्दाफाश करत पत्नी सरिता नामदेव हिला अटक केली आहे. सरिताचा प्रियकर आणि हत्येतील आरोपी इम्तियाज आलम आणि त्याचा साथीदार अस्लम फरार आहेत. दोघांचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे सरिता आणि पवन नामदेव यांचेही 15 वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. आता त्याच पत्नी सरिताने फेसबुकवर दुसरा प्रियकर बनवून पतीची हत्या केली.
हे पण वाचा
- हृदयद्रावक…सात जन्माचं वचन देताना नवरदेवाच्या छातीत कळ आली; लग्नाच्या विधींपूर्वीच वराने घेतला वधूच्या कुशीतच अखेरचा श्वास.
- धक्कादायक! पत्नीचे तिच्या मित्राशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पतीने भररस्त्यावर चाकूने वार करून केली पत्नीची हत्या.
- अमळनेर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार.पोलिसात गुन्हा दाखल.
- शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॉक मध्ये तात्काळ नोंदणी करावी-शेतकरी नेते सुनील देवरे ; महाराष्ट्र शेतकरी संघटना तालुकास्तरावर शिबिर आयोजित करणार
- एरंडोल मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसा निम्मित वही तुला