जळगाव :- येथे दिनांक 12/06/2024 रोजी मा. पोलीस निरिक्षक बबन आव्हाड सो.यांना गोपनीय माहिती मिळाली की, फैजल शेख कदीर, वय 18 वर्षे, रा. मास्टर कॉलनी, मेहरुण जळगाव हा जळगाव शहरातील खदान, तांबापुरा जवळ हातात लोखडी तलवार घेवुन दहशत माजवित आहे बाबतची माहिती मिळाल्यावरुन दुपारी 12.30 वाजता त्यास तांबापुरा येथील खदान जवळुन त्यास ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याचेकडुन एक लोखडी तलवार मिळुन आल्याने सदर तलवार जप्त करण्यात आली असुन
त्याचे विरुध्द एमआयडीसी पोस्टे गुरंन 383/2024 आर्म एक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री डॉ महेश्वर रेडडी जळगाव, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री नखाते सो. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप गावीत सो. जळगाव भाग जळगाव मा.पोलीस निरिक्षक श्री बबन आव्हाड सो. यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि/दत्तात्रय पोटे, सफौ/1428 अतुल वंजारी, पोना/विकास सातदिवे, सचिन पाटील, ललीत नारखेडे, चंद्रकात पाटील, गणेश ठाकरे, सिध्देश्वर डापकर, अशांनी केली आहे.
हे पण वाचा
- हृदयद्रावक…सात जन्माचं वचन देताना नवरदेवाच्या छातीत कळ आली; लग्नाच्या विधींपूर्वीच वराने घेतला वधूच्या कुशीतच अखेरचा श्वास.
- धक्कादायक! पत्नीचे तिच्या मित्राशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पतीने भररस्त्यावर चाकूने वार करून केली पत्नीची हत्या.
- अमळनेर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार.पोलिसात गुन्हा दाखल.
- शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॉक मध्ये तात्काळ नोंदणी करावी-शेतकरी नेते सुनील देवरे ; महाराष्ट्र शेतकरी संघटना तालुकास्तरावर शिबिर आयोजित करणार
- एरंडोल मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसा निम्मित वही तुला