जामनेर :- राज्यात महिलांसह अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. अशातच आता राज्याला हादरवून सोडणारी एक घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून समोर आली आहे.चॉकलेटचे आमिष दाखवून ३५ वर्षीय व्यक्तीने एका सहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केला. नंतर तिचा खून करून फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी मात्र पसार झाला आहे.
नेमकी काय आहे घटना?
जामनेर तालुक्यातील एका गावात आदिवासी कुटुंब राहतात. मोलमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. सदर बालिकेचे आई-वडील मंगळवारी दुपारी सकाळी मोलमजुरीसाठी बाहेर गेले असताना बालिका घरी एकटीच असल्याचा गैरफायदा संशयित आरोपीने घेतला संशयित आरोपी सुभाष इमाजी भिल (वय 35 राहणार चिंचखेडा) याने सदर व मुलीला घराबाहेर बोलून तुला चॉकलेट घेऊन देतो असे आमिष दाखवले. त्यानंतर गावाच्या बाहेर केळीच्या मळ्यात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिचा निर्घृण खून करून तो पसार झाला आहे .
सदर घटना ही मंगळवार दिनांक 11 जून रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.या धक्कादायक घटनेमुळे जामनेर तालुका हादरला आहे जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार संशय आरोपी सुभाष बिल याचा पोलीस कसून तपास करीत आहे . दरम्यान सदरहू मयत बालिकेचा मृतदेह हा शवविच्छेदन कामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव या ठिकाणी आणण्यात आलेला आहे.
जामनेर पोलिसांतर्फे आवाहन
सुभाष उमाजी भिल वय ३५ वर्ष रा केकतनिंभोरा ता जामनेर या नराधमाने गावातीलच अल्पवयीन मुलीला पळवून नेवून तिला ठार मारले आहे. तो फरार आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण हा दिसल्यास किंवा त्याचेबाबत काही माहिती मिळाल्यास तात्काळ ओळखीच्या पोलिसांना तसेच जामनेर पोलिसांना कळवावी. जेणेकरून तो तात्काळ अटक होईल आणि प्रशासनाच्या मदतीने त्यास कठोरात कठोर शिक्षा करता येईल.
संपर्क —8329008302 श्री किरण शिंदे,पोलीस निरीक्षक 8329008302
हे पण वाचा
- धक्कादायक! एका व्यक्तीने आपल्या जिवंत पत्नीला सरकारी कागदपत्रांमध्ये मृत दाखवून प्रेयसीशी केलं लग्न.
- संतापजनक!19 वर्षीय नराधम तरुणाने विवाहित महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी,नकार देताच कटरने केले 15 वार 280 टाके टाकून,गोधडीवानी शिवले पीडितेचे अंग.
- आईनं नशा करण्यासाठी पैसे न दिल्यामुळे २७ वर्षीय उच्चशिक्षित मुलाने १३ दुचाकी पेटवून दिल्या; माथेफिरू नशेखोर मुलास अटक.
- अवैधपणे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर सावदा पोलिसांच्या छापा, 60 किलो मांस जप्त, एक जणांवर गुन्हा दाखल
- आज रविवार रोजी एरंडोल येथे ‘राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद’चे आयोजन.. राज्यभरातून विविध मान्यवरांची व संविधान प्रेमीची राहणार उपस्थिती.