आजच्या दिवस कसा जाणार याचं कुहल प्रत्येकाला असतं. तो चांगलाच असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण तसं होतंच असं नाही. त्यामुळंच आपलं भविष्य जाणून घ्यायची उत्सुकता माणसाला असते.
जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजच्या दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष:
आजच्या दिवशी विद्यार्थ्यांना अनेक नव्या ठिकाणी ज्ञानार्जन करण्याची संधी मिळण्याचा आहे. कुटुंबवत्सल लोकांना घरातील काही समस्यांचा सामना करावा लागेल. तुम्ही तुमच्या व्यवसायात काही तरी चांगलं करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. व्यवसाय चांगला करण्यासाठी नवीन उपकरणे घ्यावी लागतील. घरात सुखसुविधांच्या वस्तू खरेदी करण्यावर तुमचा भर असेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आईचं जुनं दुखणं डोकं वर काढेल.
वृषभ:
आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य राहील. तुम्हाला तुमच्या कामात धावपळ करावी लागणार आहे. तुम्हाला तुमचा सहकारी त्रास देण्याची शक्यता आहे. वाहनांचा वापर अत्यंत सांभाळून करा, नाही तर अडचण होईल. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तुमच्या घरी एखाद्या पाहुण्याचं आगमन होऊ शकतं. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत काही काळ व्यतीत कराल. वाहनांचा प्रयोग सांभाळून करा. नाही तर एखादी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
मिथुन:
आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायी ठरू शकतो. तुम्हाला कुटुंबातील काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यासाठी तुम्हाला मानसिक तयारी करावी लागणार आहे. तुमच्या मनात तुम्हाला प्रेम आणि स्नेहाची भावना तयार करावी लागेल. कार्यक्षेत्रात तुम्ही एखादा पुरस्कार घ्याल. तुमचा मुलगा किंवा मुलगी नोकरीच्या निमित्ताने दूरदेशी जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला जर आधीपासूनच काही व्याधी असतील तर सावध राहा. तुम्ही एखाद्या कारणाने त्रस्त व्हाल. तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासााठी तुम्ही मेहनत घ्याल. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात तुम्ही सहभागी व्हाल.
कर्क :
आजचा दिवस उद्योग करणाऱ्यांसाठी चांगला असेल. तुमच्या एखाद्या योजनेमुळे तुम्हाला चांगला धनलाभ होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लग्नाची चर्चा सुरू असेल तर आज त्यांच्या लग्नाचं नक्की होईल. तुमच्या मित्रांसोबत तुम्ही तुमचा वेळ घालवाल. तुमच्या जीवनसाथीशी संबंध मधूर ठेवण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. तेव्हाच घरातील कुरबुरी थांबतील. बहीण भावाचं सहकार्य मिळेल. घेण्यादेण्याच्या व्यवहारापासून सावध राहा.
सिंह:
आजच्या दिवशी तुम्हाला समजून उमजून कामे करावी लागतील. लहान मुलांसोबत काही काळ घालवाल. तुमचं उत्पन्न वाढल्याने तुमच्या आनंदाचा पारावर राहणार नाही. तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. प्रदीर्घ काळ रेंगाळलेली कामे पूर्ण कराल. कुटुंबातील सदस्याच्या विवाहातील विघ्न दूर होईल. अविवाहितांच्या आयुष्यात नव्या साथीदाराचं आगमन होईल. संपत्तीशी संबंधित एखादं प्रकरणं मार्गी लावाल.
कन्या:
कामात अतिघाई करू नका. नाही तर चुकांचा डोंगर उभा राहील. तुम्हाला सावध राहिलं पाहिजे. मित्राच्या रुपातील शत्रू त्रास देतील. प्रिय व्यक्तीच्या सोबत तुमचा वाद होऊ शकतो. प्रिय व्यक्तीसोबत तुमचा वादविवाद होऊ शकतो. पर्यटनानंतर तुम्हाला अनेक महत्त्वाच्या गोष्टींची माहिती मिळेल. तुमच्या एखाद्या गोष्टीमुळे तुमचे वडील नाराज होऊ शकतात. तुमची चूक पकडली जाऊ शकते.
तूळ:
आजचा दिवस तुमच्यासाठी आपार परिश्रमाचा ठरेल. उद्योगात तुम्हाला मोठं यश मिळेल. करिअरमध्ये तुम्हाला नव्या संधी मिळतील. पण तुमचं उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. उद्योग व्यवसाय करणाऱ्यांनी कामात बदल करू नये. नाही तर तुमच्यासाठी अधिकच त्रासाचं ठरेल. जे विद्यार्थी अभ्यासाला वैतागलेत त्यांनी सीनिअर विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन घ्याव. तसेच सीनिअर विद्यार्थ्याने दिलेल्या सल्ल्याचा अंमल करण्यावर विचार करायला हवा.
वृश्चिक:
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहील. एखादं मोठं लक्ष्य गाठण्यासाठी तुम्हाला संकल्प करावा लागेल. तुम्हाला आयुष्यात संघर्षाचा सामना करावा लागेल. तुम्ही हिमतीने काम करा. घाबरू नका. तुमचा व्यवसाय आधीपेक्षा चांगला असेल. मित्रांसोबत तुमचा राजकीय गप्पांचा फड रंगेल. एखाद्या गरजवंताला मदत करण्याची संधी मिळाली तर तात्काळ मदत करा. तुम्ही तुमच्या भावनांना आवर घाला.
धनु:
आजचा दिवस परस्पर सहयोगाची भावना घेऊन येणारा असेल. तुम्ही आज एखाद्या नव्या प्रकल्पाची सुरुवात कराल. मात्र, या प्रकल्पात कुणालाही पार्टनर करू नका. नाही तर तुम्हाला वेगळ्या समस्या उद्भवतील. तुम्ही संपत्ती कमवण्याच्या कोणत्याही मार्गावरून तसूभर मागे हटणार नाही. तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न कराल. प्रेमीयुगल एखाद्या व्हॅकेशनला जाण्याचा प्लानिंग करतील. एखाद्या बाहेरच्या व्यक्तीच्या कह्यात येऊ नका. नाही तर दोघांमध्ये वाद होतील.
मकर:
आजचा दिवस समस्यांनी भरलेला असेल. एखादी निराशजनक बातमी ऐकायला मिळाल्यावर दु:खी व्हाल. नोकरीच्या ठिकाणी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी बराच वेळ घालवावा लागेल. पण त्यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील. अहंकार करू नका. नातेवाईकांकडून एखादी माहिती मिळेल. परदेशी यात्रेवर जाण्याची शक्यता आहे. आईवडिलांच्या सेवेत आज दिवसाचा काही वेळ घालवाल. कर्ज घेत असाल तर विचार करूनच निर्णय घ्या.
कुंभ:
आज तुम्हाला आर्थिक दृष्टीकोण चांगला ठेवावा लागेल. नोकरीत तुम्ही पूर्ण मेहनत कराल. तुम्ही एखाद्या दुसऱ्या नोकरीसाठीही प्रयत्न कराल. नव्या नोकरीत तुम्हाला चांगला पगार आणि प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत फिरायला जाण्याचा बेत आखाल. त्यामुळे मूड फ्रेश होईलच. पण मानसिक तणावही दूर होईल. दाम्पत्य जीवनात आनंद अनुभवाल. एकमेकांचा आदर कराल. व्यापारात उत्पन्न वाढीचे प्रयत्न करावे लागतील. त्याकडे लक्ष द्यावे लागेल. तेव्हाच तुम्हाला चांगलं इन्कम मिळेल.
मीन:
तुमचा आजचा दिवस आनंदी जाईल. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून एखादी आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. तुम्हाला डेली रुटीनचं काम पूर्ण करण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. तुम्हाला इकडतिकडच्या कामापासून सावध राहिलं पाहिजे, नाही तर कोर्ट कचेरीच्या वाऱ्या सुरु होतील. आरोग्याची काळजी घ्या. प्रवास टाळा. खर्चाला आवर घाला. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. संध्याकाळनंतरचा दिवस अत्यंत चांगला जाईल.
(या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
हे पण वाचा
- अमळनेर तालुक्यात कारमधील तरुणांनी दुचाकीला कट मारल्यानंतर झालेल्या वादात तरुणाच्या केला खून;तिन्ही आरोपींना पोलिसांनी काही तासातच केली अटक.
- “गुलाबराव पाटील यांची माणुसकीची झलक : अपघातग्रस्त माजी उपसरपंचांची रुग्णालयात भेट”
- जनतेचा असलेला प्रचंड प्रतिसाद आणि भक्कम समर्थन हेच माझे खरे बळ – गुलाबराव पाटील
- भरधाव वाहनाच्या ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ३ मोटरसायकलींना चिरडलं ५ जणांचा मृत्यू एकाची प्रकृती चिंताजनक.
- डॉ.संभाजीराजे पाटील यांचा वाढत्या प्रतिसादेला जनतेची साथ