यावल : तालुक्यातील फैजपूर येथील इस्लामपुरा भागातील २३ वर्षीय विवाहितेचा माहेरून पतीला रिक्षा घेण्यासाठी ७० हजार रुपये आणावे म्हणून चौघांनी छळ केला. पैसे आणले नाही म्हणून पतीने तिला १० जून रोजी रात्री बेकायदेशीर रित्या तीन वेळा तलाक सांगितले. तेव्हा याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात चार जणाविरूध्द मुस्लिम महिला विवाहाच्या अधिकाराचे संरक्षण, कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फैजपूर शहरात इस्लामपुरा आहे. या इस्लामपुरा भागातील शाहिदा परवीन शेख उमर फारूक वय २३ वर्षे या विवाहितेने फैजपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह १२ जुलै २०१९ रोजी शेख उमर फारूक शेख शाकीर रा.फैजपूर यांच्या सोबत झाला होता. विवाह नंतर पती शेख उमर फारुक शेख शाकीर, सासरे शेख शाकीर शेख इस्माईल, सासू हसीनाबी शेख शाकीर व दिर नदीम शेख शाकीर या चौघांनी विवाहितेचा पतीला रिक्षा घेण्यासाठी माहेरून ७० हजार रुपये आणावे म्हणून छळ केला व तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला.
विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिला १० जून सोमवार रोजी रात्री साडेनऊ वाजता पती शेख उमर फारूक याने तीन वेळा बेकायदेशीर रित्या तलाक बोलला. तेव्हा या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात मुस्लिम महिला विवाहाच्या अधिकाराचे संरक्षण, कायदा २०१९ चे कलम ४ तसेच विवाहितेचा छळ करणे आदी कलमान्वये चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार रशीद तडवी करीत आहे.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.