चोपडा :- तालुक्यातील घुमावल येथील १७ वर्षीय युवकाने गावातील तीन जणांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली असून आत्महत्या करण्यापूर्वी युवकाने लिहलेल्या सुसाइड नोटमध्ये त्या तिघांच्या नावाचा उल्लेख असल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.सविस्तर असे की, चोपडा तालुक्यातील घुमावल येथे आपल्या परिवारसोबत राहणारा मंगेश पाटील यास गावातीलच तीन जणांकडून मानसिक छळ केला जात होता दरम्यान या मानसिक छळाला कंटाळून १७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली.
मंगेशने लिहलेल्या सुसाईडनोट मध्ये या त्रास देणाऱ्या तीनही जणांची नावं असल्याने चोपडा ग्रामीण पोलिसात तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. महेंद्र एकनाथ पाटील (३८), मनोज पंढरीनाथ पाटील (४२) आणि पवन मगन पाटील (२९, सर्व रा. घुमावल बुद्रुक) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.मयत मंगेश याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोट लिहून ठेवली होती. त्यात त्याने आई-वडील यांची माफी मागत महेंद्र एकनाथ पाटील, मनोज पंढरीनाथ पाटील, पवन मगन पाटील (सर्व रा. घुमावल ता. चोपडा) यांच्या धमक्यांना, त्रासाला कंटाळत आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहून ठेवले आहे.
आईच्या टाहो अन् नातेवाईकांचे अश्रू अनावर
बाळा मंगेश, उठ आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचे आहे, आईचा टाहो मंगेशच्या मृत्यूनंतर त्याची आई त्याला पाहून मंगेश उठ आपल्याला महादेव मंदिरात जायचे आहे, असे सांगून त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी जवळच्या नातेवाईकांना अश्रू अनावर झाले होते. घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली.
हे पण वाचा
- गावा- गावात गुलाबभाऊंच्या भगव्या वादळाची तुफान लाट;१२ दिवसांत १२१ गावांत शिवसेनेच्या धनुष्याचा डोर- टू – डोर जयघोष
- डॉ.संभाजीराजे पाटील यांचा वाढत्या प्रतिसादेला जनतेचा भक्कम पाठिंबा
- अपक्ष उमेदवार डॉ हर्षल मानेच्या प्रचारात सौभाग्यवतींनी घेतली प्रचारात आघाडी; गावोगावी महिला औक्षण करुन देत आहे विजयी होण्याच्या आशीर्वाद.
- गुलाबभाऊंच्या “धनुष्यबाणाला” प्रचंड मतांनी विजयी करा, माजी सभापती ललिताताई कोळी यांचे आवाहन
- अमळनेर येथे दुचाकीवरून साडे तीन किलो गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केले जेरबंद, १ लाख ३८ हजाराचा मुद्देमाल जप्त.