Viral Video: हल्ली दिल्ली मेट्रो म्हटलं तरी अनेकांना हसू येतं. यामागचे कारणही तसेच आहे. सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोतील व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. ज्या प्रकारे सोशल मीडियावर कधी काय वाचायला वा पाहायला मिळेल हे सांगता येत नाही, त्याच प्रकारे आता दिल्ली मेट्रोमध्येही कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही.अलीकडे तर अनेक जण प्रसिद्ध होण्यासाठी दिल्ली मेट्रोमध्ये जाऊन रील्स बनवताना दिसतात. शिवाय कधी कोण गाणं म्हणतं, फोटोशूट करतं इतकंच काय तर कपल्सही दिल्ली मेट्रोमध्ये अनेकदा रोमान्स करताना दिसतात.
पण कधीकधी मेट्रोमध्ये महिलांची भांडण, मारामारी देखील पाहायला मिळते. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.काही महिलांना भांडण करायला कारण लागत नाही. त्या कधीही, कुठेही, कोणत्याही कारणावरुन वाद घालू शकतात. पण गोची तेव्हा होते जेव्हा एका महिलेसमोर दुसरी महिलादेखील तोडीसतोड वाद घालत असते. कोणत्याही भांडणात जेव्हा दोन्ही व्यक्ती सारख्याला वारखे असतात तेव्हा तो वाद खूप रंगतो. दिल्ली मेट्रोच काय तर मुंबईच्या लोकल ट्रेनमधील महिलांच्या भांडणाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात.
सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ दिल्ली मेट्रोतील असून यामध्ये दोन महिला एकमेकींना मारहाण करताना दिसत आहेत.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बऱ्याच महिला मेट्रोमधून प्रवास करत आहेत यात काही महिला सीटवर बसल्या असून काहीजणी उभ्या आहेत. यावेळी अचानक दोन महिलांचे भांडण सुरु होते, या दोघीही कोणत्यातरी कारणावरुन एकमेकींशी वाद घालताना दिसत आहेत, त्यांचे भांडण ऐकून काही महिला हसत आहेत तर काहीजणी त्या दोघींना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत.
काही वेळानंतर दोघींमधील एकजण दुसरीच्या कानाखाली वाजवते, तिने कानाखाली वाजवताच दुसरी महिला तिचे केस ओढते, अशा प्रकारे या दोघांची मारामारी सुरु होते. त्यावेळी मेट्रोतील इतर महिला त्यांना थांबण्यासाठी धावतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ‘दिलवाल्यांची दिल्ली कधी सुधारणार? तिच नेहमीची चर्चित जागा दिल्ली मेट्रो, पुन्हा एकदा महिलांचा राडा! एकमेंकींना बेदम चोप, कानाखाली, नखांचे ओरखडे’.हा व्हिडीओ X(ट्विटर) वरील @Rahul Saini या अकाउन्टवरुन शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडीओला सोशल मीडियावर आतापर्यंत जवळपास सहा हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून अनेक लाइक्सही मिळाल्या आहेत. शिवाय यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘महिलांचे महाभारत’, तर दुसऱ्याने लिहिलंय की, ‘हे खूप मनोरंजक आहे’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘पुढचा व्हिडीओ पाहायला आणखी मजा आली असती’
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.