एरंडोल :- तालुक्यातील खेडगाव येथील राहणारे किसन मोरसिंग राठोड वय ४६ या शेतकऱ्याने कर्जबाजारीला कंटाळून राहत्या घरात विषारी औषध सेवन केल्याची घटना शनिवारी १५ जून रोजी दुपारी २ वाजता घडली होती.जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना मंगळवाारी १८ जून रोजी मध्यरात्री २ वाजता मृत्यू झाला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.याबाबत अधिक असे की, किसन राठोड हे आपल्या कुटुंबासह एरंडोल तालुक्यातील खेडगाव येथे वास्तव्याला होतो.
शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. दरम्यान, शेतीसाठी ते कर्जबाजारी झाले होते. कर्जबाजारीला कंटाळून त्यांनी शनिवारी १५ जून रोजी दुपारी २ वाजता राहत्या घरी विषारी औषध सेवन केले. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी खासगी वाहनाने तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचारा सुरू असतांना मंगळवारी १८ जून रोजी मध्यरात्री २ वाजता मृत्यू झाला. मृत्यूची वार्ता कळताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. त्यांच्या पश्चात पत्नी लताबाई आणि अनिल व सुनिल असे दोन मुले असा परिवार आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हे पण वाचा
- मेहुणीने स्वतःच्या लग्नात दाजीसोबत दिली अशी पोझ की भावोजी सापडले अडचणीत, अटक होण्याची आली वेळ.
- ‘अर्ध्यावरती डाव मोडीला’…. ‘अधुरी एक प्रेम कहाणी’; अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथे तरुण विवाहितेचा शॉक लागून मृत्यू
- भडगांव तालुक्यातील कजगांव शिवारातील शेतातील विहीरीत आढळला २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह.
- गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी एरंडोल तालुक्यातील एकास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
- Viral Video: एका महिलेच्या दिल्ली मेट्रोत बेभान मादक डान्स, पाहून नेटकरी चक्रावले पहा व्हिडिओ