कानपूर:- हॉटेल मध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याबरोबर आक्षेपार्ह अवस्थेत आढळलेल्या पोलीस उप-अधिकक्षकाला थेट शिपाई पदावर पदावनत करण्यात आलं आहे. कृपा शंकर कनौजिया असं या पोलीस अधिकाऱ्यांचं नाव आहे.तीन वर्षांपूर्वी ते एका महिला पोलीस कर्मचाऱ्याबरोबर कानपूरमधील एका हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले होते.इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, २०२१ साली कृपा शंकर कनौजिया हे उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये सर्कल ऑफिसर म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी घरी जाण्यासाठी वरिष्ठांकडे सुट्टीचा अर्ज दिला होता.
वरिष्ठांनी त्यांची सुट्टीदेखील मंजूर केली. मात्र, ते उन्नावमधून थेट घरी न जाता कानपूरमधील एका हॉटेलमध्ये पोहोचले. हॉटेलमध्ये पोहोचताच त्यांनी त्यांचा खासगी आणि सरकारी फोन बंद करून ठेवला होता. यादरम्यान, त्यांच्या पत्नींनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांच्या पत्नीने यांची माहिती उन्नावच्या पोलीस अधिक्षकांना दिली.उन्नाव पोलिसांनी जेव्हा कृपा शंकर कनौजिया यांना शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन कानपूरमधील एका हॉटेलमध्ये दिसून आले.
त्यानंतर उन्नाव पोलिसांनी थेट संबंधित हॉटेलमध्ये जाऊन तपासणी केली, त्यावेळी कृपा शंकर कनौजिया हे एका महिला पोलीस कर्मचाऱ्याबरोबर आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले.या घटनेनंतर उन्नाव पोलिसांनी याप्रकरणाचा सविस्तर अहवाल उत्तर प्रदेश सरकारकडे सादर केला होता. त्यानंतर सरकारने तीन वर्षांनंतर त्यांना पोलीस उप-अधिक्षक पदावरून पोलीस शिपाई पदावर पदानवत करण्याची शिफारस केली. सरकारच्या या शिफारशीनंतर आता अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी यासंदर्भातील निर्देश जारी केले आहेत.
पत्नीने घेतली पोलीसात धाव
कन्नौजिया घरी न पोहोचल्याने त्यांच्या पत्नीला काळजी वाटू लागली. ते पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यांनी उन्नावच्या पोलीस अधीक्षकांना कन्नौजिया बेपत्ता झाल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याचा शोध घेणे सुरु केले. उन्नाव पोलिसांनी सीओ कन्नौजिया यांचा मोबाईलचे लोकेशन शोधले.
पाेलीस महानिरीक्षकांनी केली हाेती कठोर कारवाईची शिफारस
उत्तर प्रदेश पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही घटना अत्यंत गांभीर्याने घेतली. लखनौ परीक्षेत्रातचे तत्कालीन पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) यांनी त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची शिफारस केली होती. त्याचाच परिणाम म्हणजे कन्नौजिया यांच्यावर कारवाई करून त्यांची पदावनती करण्यात आली आहे. ते आता पोलीस उपअधीक्षक ( डीवायएसपी) पदावरुन हवालदार झाले आहेत. प्रांतिक आर्म्ड कॉन्स्टेब्युलरी (पीएसी) गोरखपूर बटालियनमध्ये कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
हे पण वाचा
- मेहुणीने स्वतःच्या लग्नात दाजीसोबत दिली अशी पोझ की भावोजी सापडले अडचणीत, अटक होण्याची आली वेळ.
- ‘अर्ध्यावरती डाव मोडीला’…. ‘अधुरी एक प्रेम कहाणी’; अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथे तरुण विवाहितेचा शॉक लागून मृत्यू
- भडगांव तालुक्यातील कजगांव शिवारातील शेतातील विहीरीत आढळला २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह.
- गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी एरंडोल तालुक्यातील एकास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
- Viral Video: एका महिलेच्या दिल्ली मेट्रोत बेभान मादक डान्स, पाहून नेटकरी चक्रावले पहा व्हिडिओ