हैंदराबाद :- येथील शादनगर परिसरात अन्नराम गावातील श्रीकांत या 39 वर्षीय व्यक्तीचा जेवताना चिकनचा तुकडा घशात अडकल्याने त्याचा मृत्यू झाला. श्रीकांत हैदराबादला त्याच्या बहिणीला भेटायला गेला होता आणि कोठी येथील एका बारमध्ये जेवण करत होता. चिकन बिर्याणी खाताना आणि दारूचे सेवन करत असताना चिकनचा तुकडा घशात अडकल्याने त्याचा श्वास कोंडला. झालल्या त्रासामुळे तो बारच्या बाहेर आला आणि रस्त्यावर कोसळला. स्थानिक रहिवाशांनी तातडीने पोलिसांना बोलावले.
पोलिसांनी श्रीकांतला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू आहे. श्रीकांतचा मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी उस्मानिया जनरल हॉस्पिटलच्या शवागारात नेण्यात आला असून शादनगर येथील त्याच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.