मुझफ्फरपूर:- प्रेमाला वयाचं बंधन नसतं हे आपण ऐकलंच असेल. पण हीच म्हण सत्यात उतरली तर त्याचा गावभर बोभाटा झाल्याशिवाय राहत नाही. काहीशी अशीच धक्कादायक घटना आज तुम्हाला सांगणार आहोत.बिहारमधील मुझफ्फरपूरच्या सकरा पोलीस ठाणे परिसरात घडलेल्या पळवा-पळवीचा प्रकार सध्या जोरदार चर्चा आहे. येथील एका महिलेचा पती मेहुणीसह फरार झाला, तर दुसरीकडे आईही सासऱ्यासोबत पळून गेल्याचा प्रकार घडला आहे.फरीदपूर येथील रहिवासी असणाऱ्या पीडित सुधा कुमारी यांनी घडला प्रकार सांगितला आहे.
21 जून 2021 मध्ये तिचा विवाह हिंदू पद्धतीनुसार भगवानपूर येथील छोटू कुमारसोबत झाला होता. लग्नानंतर छोटू कुमार सोबत तीन वर्ष सुखानं संसार सुरू होता. पण जानेवारी 2024 पासून पती छोटू कुमार मेहुणीसोबत फोनवर बोलू लागला. फोनवर बोलता बोलता 5 महिने लोटले. त्यानंतर 3 जून 2024 रोजी छोटू कुमार माझ्या लहान बहिणीला घेऊन दिल्लीला पळाले. तिकडेच दोघांनी लग्न केलं. सोशल मीडियातून मला याबाबत माहिती मिळाल्याचं सुधा कुमारी यांनी सांगितलं.
सासऱ्यासह आईही फरार
हा सगळा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही, तर यापुढं पीडितेची आई तिच्या सासऱ्यालाच घेऊन पळाली. माझी लहान बहीण आणि माझा नवरा पळून जाण्यासाठी माझी आई फूल कुमारी देवी जबाबदार आहे. माझ्या आईने दोघांना ढोली स्टेशनवर सोडलं होतं. ते पळून जाताना त्यांना 2000 रुपयेही दिले. त्यानंतर माझ्या आईने दोघांचा शोध घेण्याचं निमित्त केलं आणि तुम्ही सासरच्या घरीच राहा, मी दोघांचा शोध घेईन, असं सांगू लागली. पण मी सोबत जाण्यावर ठाम होते. तेव्हा तिनं तू जाणार असशील तर मी येणार नाही अशी भूमिका घेतली.आई फूल कुमारी देवी आणि सासरे बिराजी भगत जावई आणि लहान बहिणीला शोधण्याच्या निमित्ताने गेले. पण ते शोध घेण्यासाठी नाहीतर पळून गेल्याचं नंतर लक्षात आलं. कारण माझी आई सासऱ्यासोबतच दिल्लीत राहू लागली. आता माझा फोनही उचलत नाही, असं पीडित सुधा कुमारीनं सांगितलं.
पीडितेच्या पतीनं सांगितलं सत्य
माझी सासू फूल कुमारी मला वारंवार मेहुणीशी लग्न करण्यास सांगत होती. यासाठी माझ्या सासूबाईंनी मला पैसे आणि गाडी देण्याचं आश्वासनही दिलं होतं. या लालसेपोटी मी लग्न केलं. मग सासूबाई घरापासून दूर एका मंदिरात आल्या आणि माझ्यासोबत लहान मुलीचं लग्न लावून दिलं. आता मला माझ्या दोन्ही बायकांना सोबत ठेवायचं आहे, असं पीडितेचा पती छोटू कुमारनं सांगितलं. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. परंतु, या प्रकाराची सर्वत्र चर्चा होतेय.
हे पण वाचा
- मेहुणीने स्वतःच्या लग्नात दाजीसोबत दिली अशी पोझ की भावोजी सापडले अडचणीत, अटक होण्याची आली वेळ.
- ‘अर्ध्यावरती डाव मोडीला’…. ‘अधुरी एक प्रेम कहाणी’; अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथे तरुण विवाहितेचा शॉक लागून मृत्यू
- भडगांव तालुक्यातील कजगांव शिवारातील शेतातील विहीरीत आढळला २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह.
- गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी एरंडोल तालुक्यातील एकास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
- Viral Video: एका महिलेच्या दिल्ली मेट्रोत बेभान मादक डान्स, पाहून नेटकरी चक्रावले पहा व्हिडिओ