अबब! नगरदेवळ्यात आढळली अस्सल नागीण अन् सोळा लहान पिल्ले.

Spread the love

नगरदेवळा, ता. पाचोरा : एकाच वेळी अस्सल नागीण आणि तिची १६ लहान पिल्ले, हे ऐकूण आश्चर्य वाटते ना. हो घटना घडली आहे नगरदेवळा गावात. ता . पाचोरा या सर्वांना जीवदान देण्याचे कार्य केले ते बाळद येथील सर्पमित्र सागर पाटील व भडगाव येथील सर्पमित्र सागर महाजन यांनी.

नगरदेवळा येथील शेतकरी छोटू दत्तू पाटील यांच्या वडगाव शिवारातील शेतात काम करत असताना सर्प आढळला. त्यांनी त्वरित ■ सर्पमित्र सागर पाटील यांच्याशी संपर्क ■ साधून बोलावून घेतले. त्याठिकाणी सागर पाटील यांनी निरीक्षण केले असता त्यांच्या लक्षात आले की, -. येथे नुसती नागीणच नाही तर अजून पिल्ले असू शकतात. त्यानंतर त्यांनी सर्पमित्राने दिले सर्व सापांना जीवदान

एका मागोमाग एक असे १६ पिल्ले

माझ्या चौदा वर्षांच्या काळात जळगाव जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे की, एका नागीणचे १६ पिल्लू सापडलेत. या ठिकाणी गेल्यावर मला तेथे अजून पिल्ले असू शकतात, असा संशय आला. हळूहळू सर्व पिल्ले बाहेर काढली. मार्च, एप्रिल महिन्यात साधारणपणे सर्वांचा प्रजनन काळ असतो व सर्प अंडी घालतात. त्यानंतर दोन महिन्यांत ती फुटतात, यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर पिल्ले निघाली. सागर पाटील, सर्पमित्र, बाळद

या वेळी शेतकरी छोटू दत्तू पाटील, किरण राजपूत, कडू बहिरम व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. या वेळी सर्पमित्रांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले

टीम झुंजार