यावल : तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील माहेर असलेल्या एका २० वर्षीय विवाहितेचा पती व सासरे दोघांनी छळ केला. तिला शिवीगाळ करून पतीने दारूच्या नशेत मारहाण केली. आणि तिला उपाशी पोटी ठेवून घराच्या बाहेर हाकलून दिले. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात विवाहितेच्या फिर्यादीवरून बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली बुद्रुक ता. यावल या गावातील माहेर असलेल्या पल्लवी योगेश चौधरी वय २० वर्षे या विवाहितेने यावल पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह १५ जून २०२२ रोजी योगेश किशोर चौधरी रा. मंगलमूर्ती पार्क, विश्राम नगर, वेड रोड सुरत, गुजरात यांच्याशी झाला होता. विवाह नंतर पतीने दारूच्या नशेत सतत विवाहितेला शिवीगाळ करणे मारहाण करणे जेवण न देणे असा छळ सुरू केला.
तसेच पती योगेश चौधरी आणि सासरे किशोर चौधरी दोघांनीही विवाहितेला त्रास देऊन रात्री घराच्या हाकलून दिले तेव्हा विवाहितेच्या फिर्यादीवरून पती व सासरे दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






