Viral Video : काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्र-विचित्र स्टंट करून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण, ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशीसुद्धा येते.स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. वाहतुकीचे नियम मोडून रस्त्यावर वाहनांची भन्नाट स्टंटबाजी करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण, व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळविण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत.
असाच काहीसा प्रकार आता समोर आला आहे. धावत्या लोकलच्या दरवाजात डान्स करतानाचा एका तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.सोशल मीडियावर व्हायरल होण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की, लोकांना काहीही करून व्हायरल व्हायचे आहे. त्यासाठी स्वत:चा व इतरांचा जीव पणाला लावावा लागला तरी चालेल. रीलमाफियांना पोलिस आणि कायद्याची भीती तर नाहीच; पण आपला जीव गमवावा लागण्याचीही भीती राहिलेली नाही. आता आणखी एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे;
ज्यामध्ये एक महिला चालत्या ट्रेनच्या दारावर नाचताना दिसत आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला रेल्वे डब्याच्या दरवाजात उभी असताना ‘होगा तुमसे प्यारा कौन’ या बॉलीवूड गाण्यावर आनंदाने नाचत असल्याचे दिसून येते. इथे आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती एका वेगवान ट्रेनच्या दरवाजाजवळच नाचत आहे. अशा स्थितीत तिचा थोडासा जरी तोल गेला असता तरी तिला काहीही होऊ शकले असते. मात्र, असे असतानाही तिने न घाबरता, रील बनवणे सुरूच ठेवल्याचे दिसतेय. रील कल्चरचा तरुणाईला एवढा मोह पडलाय की, रील बनविण्याच्या नादात अनेकांना आपल्या जीवाचीही पर्वा राहत नाही.
खरे तर क्रिएटिव्हिटीला वाव देणाऱ्या या रील कलेला विकृत रूप येऊ लागलेय का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.हा व्हिडीओ एक्सवर @ChapraZila नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; ज्याला ८५.६ हजार व्ह्युज मिळाले आहेत. त्यावर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले- मला वाटते की, या मुलीने तिचे मानसिक संतुलन गमावले आहे. तर दुसऱ्याने लिहिलेय की, प्राणापेक्षा जास्त आहेत. एका युजरने लिहिलेय की, अशा लोकांना फक्त पोलिसांचा लाठीमारच सुधारू शकतो.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






