समस्तीपूर (बिहार) :- येथे एका अजब लग्नाची सध्या चर्चा सुरु आहे. नवरदेव तयार होऊन वरात घेऊन नवरीच्या घराजवळ पोहोचला, पण त्याच वेळी नवरी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली.त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी संगनमताने नवऱ्याचं लग्न त्याच्या मेव्हणीसोबत लावलं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी नवरीला ताब्यात घेतलं आहे. तर त्या नवरीने भलतीच माहिती दिली. प्रियकराने तिचं अपहरण केल्याचा आरोप तिने केला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
विभुतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या एका गावामध्ये विचित्र घटना घडली आहे. नवरदेवाची वरात शुक्रवारी रात्री नवरीच्या घराच्या दारापाशी पोहोचली. पण टॉयलेटच्या बहाण्याने नवरी घरातून बाहेर बागेत चालत गेली. तिथे तिचा प्रियकर तिची वाट बघत होता. प्रियकरासाठी ती लग्नाच्या दिवशी होणाऱ्या नवऱ्याचा विचार न करता पळून गेली. वधू पळून गेल्याचं लक्षात आल्यावर मुलीकडच्या नातेवाईकांचं टेन्शन वाढलं. त्यांनी लोकांनी नावे ठेऊ नये म्हणून एक वेगळीच शक्कल लढवली. वधूच्या छोट्या बहिणीसोबत नवरदेवाचं लग्न लावण्यात आलं.
रोसडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाबडा या गावात विभुतीपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावातून वरात आली होती. नवरीच्या घरच्या लोकांनी लग्नाची सगळी तयारी केली होती. वरात घराजवळ आल्याचं समजताच नवरी टॉयलेटच्या बहाण्याने बाहेर पडली आणि गावातल्याच तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. वधूच्या घरच्यांनी तिला खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण ती सापडली नाही. मुलगी गायब झाल्यावर काय करावं, हे कुणालाच सुचत नव्हतं.
नवऱ्याच्या घरच्यांना नवरी पळून गेल्याची माहिती देण्यात आली. काही वेळाने नवरा त्याच्या मेव्हणीसोबत लग्नासाठी तयार झाला आणि लग्नाचे सगळे विधी व्यवस्थित पार पडले.लग्न झाल्यानंतर मुलगी गायब झाल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली. नवरी मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याचं सांगण्यात आलं. पोलिसांना रात्री मुलगी गायब झाल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी तपास करुन सकाळी तिला शोधून काढलं. त्या वधूची चौकशी सध्या सुरु आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर वधून वेगळीच गोष्ट सांगितली.
मनीष नावाच्या तिच्या प्रियकराने अपहरण केल्याचं तिने सांगितलं. तिच्या कुटुंबातल्या कोणालाही तिचं म्हणणं पटलं नाही. रात्रभर ती मनीष आणि तिच्या मित्रांसोबत होती, असं तिने सांगितलं. पण सकाळी तिचा प्रियकर तिला सोडून पळून गेला. मनीष आणि तिच्या मित्रांनी तिला मारहाण केल्याचंही तिने सांगितलं. या मुलीच्या सांगण्यावरुन मनीष आणि त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पण तिच्या घरातले लोक मात्र तिला परत घरी घ्यायला तयार नाहीत.
हे पण वाचा
- देवघरातल्या दिव्यामुळे घराला लागली आग, स्वयंचलित दार झाले लॉक; व्यापाऱ्यासह तिघांचा होरपळून मृत्यू.
- भाऊ बहिणीने आईला केला व्हिडीओ कॉल, दोघांच्या विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न;आईच्या सतंर्कतेमुळे अग्निशमन दलाने दिले जीवदान
- मतदार संघातील जनतेचे भक्कम समर्थन हेच माझे खरे बळ :-डॉ.संभाजीराजे पाटील
- “गुलाबराव पाटलांचे गावोगावी जंगी स्वागत”! विकास कार्यांवर जनतेचा विश्वास; भवरखेडा येथे उघड्या जीप मधून भव्य प्रचार रॅली ठरली आकर्षण
- अखिल भारतीय मराठा महासंघाचा वतीने महायुतीचे अधिकृत उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांना पाठींबा जाहीर.