सराभानगर (लुधियाना):- तरुणीने साखरपुडा झाल्यानंतर लग्न समारंभाच्या सहा दिवस आधी आपले जीवन संपवले आहे. लग्नाला काही दिवस शिल्लक असतानाच १८ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे.मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणी ही घरकाम करत होती. अनेक घरात ती मोलकणीचे काम करत होती. तिने आपला जोडीदार स्वत:च निवडला होता. याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, तिचे प्रियकरासोबत भांडण झाले होते. सराभा नगर पोलिसांनी मृत मुलीच्या २० वर्षीय नियोजित वरास अटक केली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी मुलगी घरी एकटी असताना ही घटना घडली.तिचे आई-वडील १८ वर्षीय मुलीसाठी लग्नाचा ड्रेस विकत घेण्यासाठी बाहेर गेले होते. मुलगी आणि तिचा होणारा पती वर्षभरापासून रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला या लग्नाला दोन्हीकडच्या पालकांनी विरोध केली होता. मात्र त्यांनी त्यांनी समजूत काढली होती.मृताच्या आईने सांगितले की, आरोपी किराणा दुकानात कामाला असून दोन आठवड्यांपूर्वी त्याचा आपल्या मुलीशी साखरपुडा झाला होता. २८ जून रोजी त्यांचे लग्न होणार होते.
मुलगी लग्नासाठी उत्सुक होती व आनंदी होती . शनिवारी तिने तिच्यासाठी लग्नाचा ड्रेस खरेदी करण्यासाठी आई-वडिलांना बाजारात पाठवले. सायंकाळी ते परतले असता त्यांना त्यांना घरातील दृष्य पाहून धक्का बसला. तिचा मृतदेह लटकला होता. तिचे शेवटचे संभाषण आरोपींशी फोनवर झाल्याचे कुटुंबीयांना समजले. विचारणा केली असता त्यांनी त्यांच्यात भांडण झाल्याचे सांगितले, ज्यानंतर तिने आपले जीवन संपवले. सराभा नगरचे स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) इन्स्पेक्टर परमवीर सिंह यांनी सांगितले की,
१८ वर्षीय मुलीच्या आईच्या जबाबानंतर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.आरोपीने पोलिसांना सांगितले की, भांडणादरम्यान त्याने आपला संयम गमावला आणि आपण रागाच्या भरात तिच्याशी लग्न करणार नाही असे सांगितले. त्यानंतर तिने टोकाचे पाऊल उचलले. तरुणीच्या मृत्यूने तिच्या आई-वडिलांना धक्का बसला असून लग्नघरावर शोककळा पसरली आहे. ६ दिवसांनंतर जिची वरात जाणार होती, तिची अंत्ययात्रा काढण्याची वेळ कुटूंबीयांवर आली.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






