भोपाळ : मध्य प्रदेशातील गुनामध्ये लव्ह जिहादची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपली ओळख लपवून आरोपीने एका २० वर्षीय तरुणीशी मैत्री करून तब्बल दीड वर्ष तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.यावेळी आरोपी अर्शदने या मुलीचा अश्लिल व्हिडिओही बनवला आणि या व्हिडिओद्वारे धमकी देऊन त्याने अनेकवेळा बलात्कार केला. एवढेच नाही तर त्याने मुलीवर अत्याचार केला आणि तिचा धर्म बदलून मुस्लिम होण्यासाठी दबाव आणला. तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत मुलीने सांगितले की, ती गुना येथे राहते आणि खाजगी नोकरी करते आणि पैसे घरी पाठवते. सुमारे दोन वर्षांपूर्वी भय्यू नावाच्या तरुणाने तिला इन्स्टाग्रामवर मेसेज केला होता. तरुणीने तो कोण आहे आणि तो तिला कसा ओळखतो, असे विचारले असता, आरोपी अर्शदने उडवाउडवीची उत्तरे दिली. हळूहळू त्याने मुलीला आपल्या जाळ्यात अडकवले आणि तिच्याशी बोलू लागला.आरोपी मुलीचे घर शोधून तेथे पोहोचला. तेथे त्याने तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला आणि अश्लील छायाचित्रे काढली.
तरुणीचे म्हणणे आहे की, सुमारे तीन महिन्यांपूर्वी त्याच्या मोबाईलमध्ये अनेक मुस्लिम तरुणांचे संपर्क सापडले होते. याबाबत आरोपीला विचारले असता त्याने आपले नाव अर्शद असल्याचे सांगितले. मुलीने सांगितले की सत्य समजल्यानंतर तिने त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला, परंतु अर्शद तिला ब्लॅकमेल करत होता. तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. मुलीचे म्हणणे आहे की अर्शदने तिला जीन्स घालण्यास मनाई करण्यास सुरुवात केली. सूट आणि बुरखा घालायला सांगायचा. इतकंच नाही तर तो तिला वाटेल तेव्हा फोन करायचा.
मुलगी म्हणाली की, ‘गेल्या दीड वर्षांपासून अर्शदने माझा खूप छळ केला. तो मारायचा. तरीही घरच्या आणि सार्वजनिक शरमेच्या भीतीने ती सहन करत राहिली. तीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर मारहाणीच्या खुणा आहेत. नंतर सहकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार पीडित मुलीने हिंदू संघटनांशी संपर्क साधला. त्यांच्या मदतीने तिने कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. कोतवाली पोलिसांनी बलात्कार, मारहाण यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……