गंभीर जखमी झालेल्या ममता पोलिस अधीक्षक कार्यालयात घुसल्या आणि कोसळल्या. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ ममताना जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
बंगळूर :- कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर काल सकाळी हासन पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरच हवालदार लोकनाथने आपल्या पत्नीचा चाकूने भोसकून खून केला.हासन शहराबाहेरील चन्नपट्टण येथे रहाणारी ममता (वय ३८) असे महिलेचे नाव आहे. ममताने १७ वर्षांपूर्वी के. आर. पुरमच्या लोकनाथशी लग्न केले होते.
त्यांना दोन मुले आहेत.अनेक महिन्यांपासून या दाम्पत्यामध्ये कौटुंबिक वादावरून वारंवार भांडणे होत होती. त्यामुळे संतापलेली पत्नी ममता सकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयात पती लोकनाथ यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी गेली होती. पत्नी पोलिस अधीक्षक कार्यालयात आल्याचा राग मनात धरून हवालदार असलेल्या पती लोकनाथ याने आपल्या पत्नीच्या छातीवर चाकूने वार केले व कार्यालयासमोरून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या ममता पोलिस अधीक्षक कार्यालयात घुसल्या आणि कोसळल्या.
कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ ममताना जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पत्नीचा खून करून पळून गेलेला आरोपी पती लोकनाथ याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. जावई मालमत्तेसाठी, जागेसाठी व पैशासाठी वारंवार त्रास देत असल्याची तक्रार सासरे शामण्णा यांनी केली. पोलिस अधीक्षक मोहम्मद सुजिता यांनी सांगितले की, कौटुंबिक वादामुळे दोघांमध्ये भांडण झाले होते. काल सकाळी ममता तक्रार देण्यासाठी आल्या असता कार्यालयासमोर हा प्रकार घडला.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






