Viral Video: रिल्स बनवण्यासाठी तरुण पिढी काय करेल याचा काही नेम नाही. अनेकजण सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी काही ना काही नवनवीन करून दाखवण्याचा प्रयत्न करत असतात मात्र प्रत्येकजण यात यशस्वी होत नाही.बऱ्याचदा अशात अनेकांची फजिती होते. यातच काही लोक अनेकदा जीवघेणे प्रकार करायला बघतातआणि स्वतःच जीव गमवून बसतात. अशा अनेक घटनांचे व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून नक्कीच तुम्ही थक्क व्हाल.व्हिडिओत जर आपण पाहिले तर दिसते की, एक तरुण स्कुटी घेऊन चक्क समुद्रात जात आहे. यावेळी त्याने डोक्यात हेल्मेट घातले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा तरुण फक्त रील काढण्यासाठी समुद्रात आपला जीव पणाला लावत आहे. यावेळी समुद्रात मोठमोठ्या लाटादेखील उसळत आहे मात्र हा तरुण न डगमगता पुढे जात आहे. समुद्राच्या त्या उसळत्या लाटा पाहून हा तरुण यात वाहून जातोय की काय अशी दाट शक्यता वाटते मात्र तरीही हा तरुण थांबत नाही.
यावेळी तो लाटांमध्ये स्कुटी चालवायला बघतो. तो एकदा स्कुटी पाण्यात सोडून देतो; पण पुन्हा नंतर उचलतो. हा संपूर्ण प्रकारचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाच धडकी भरू लागेल .दरम्यान हा वाय्राल व्हिडिओ @Luchovoltio नावाच्या X अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओतील व्यक्तीला सुदैवाने काहीही झाले नसून तो सुखरूप पाण्याबाहेर आला. मात्र हा व्हीडीओ नक्की कुठला आणि कधीचा आहे याची कोणतीही माहिती मिळलेली नाही. हा व्हिडिओवर अनेकांनी मजेदार कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.