येरवडा (पुणे) :- आंतरधर्मीय तरुणाने बहिणीस पळवून नेल्याच्या रागातून तिच्या भावाने मुलाच्या वडिलांवर कोयत्याने वार करून त्यांचा खून केला. ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजता येरवडा येथील राजीव गांधी नगर परिसरा घडली. येरवडा पोलिसांनी याप्रकरणी मुलीच्या भावासह दोघांना अटक केली.कठाळू कचरूबा लहाडे (वय ६०, रा. राजीव गांधी नगर, येरवडा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी इस्माईल रियाज शेख (वय २४), संकेत उमेश गुप्ता (वय २१, दोघेही रा. राजीव गांधी नगर, येरवडा) यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत लहाडे यांचा मुलगा धम्मकिरण लहाडे (वय २५) याने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा येथील राजीव गांधीनगरमध्ये लहाडे व शेख कुटुंबीय राहतात. कठाळू यांचा मुलगा योगेश लहाडे (वय २४) याचे इस्माईलच्या बहीणीसमवेत प्रेमसंबंध होते.त्यातूनच दोघांनीही पळून जाऊन नुकतेच लग्न केले होते. त्याचा राग इस्माईलच्या मनात होता. सोमवारी दुपारी दीड वाजता इस्माईल व त्याचा मित्र संकेत गुप्ता हे दोघे कठाळू यांच्या घराजवळ आले. दोघांनी कठाळू लहाडे यांच्यावर कोयत्याने वार केले.
या घटनेत गंभीर जखमी झाल्याने लहाडे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिस घटनास्थळी पोहचले. या घटनेनंतर पोलिसांनी इस्माईल व संकेत या दोघांना तत्काळ अटक केली.बहिणीला पळवून नेल्यामुळे तरुणाने मुलाच्या वडिलांवर कोयत्याने वार करून खून केला. या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक केली आहे.-रवींद्र शेळके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.