नाशिक : जिल्ह्यात अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता मालेगावमधून एक हृदयद्रावक घटना समोर येत आहे. वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना दोन मुली आणि जावयाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून नात गंभीर जखमी झाली आहे.मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगावच्या वाके शिवारात ही घटना घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगावच्या वाके शिवारात वडिलांच्या अंत्यविधीसाठी येत असताना दोघी मुली व जावयाचा भीषण अपघातात मृत्यू झाला. उभ्या असलेल्या कंटेनरवर टाटा पंच गाडी जावून धडकल्याने हा अपघात झाला आहे.
तीन जणांचा मृत्यू; एक गंभीर जखमी
अपघातात मीनाक्षी अरुण हिरे, सुनंदा विकास सावंत, विकास चिंतामण सावंत या तिघांचा मृत्यू झाला. तर नात वैभवी प्रवीण जाधव ही गंभीर जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी नातेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे मालेगावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बसच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू
दरम्यान, नाशिक शहरात बसच्या धडकेत एका शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. नाशिकरोड मालधक्का रोडवरील मनपा सिटीलिंक बस डेपोमध्ये ही घटना घडली आह. बस डेपोच्या आवारात जिजाबाई गवई यांची चहाची टपरी असून त्यांची नात सानवी सागर गवई ही तिच्या आजोबांसोबत शाळेतून चहा टपरीवर जात होती. दरम्यान सिटीलींक बस चालकाने भरधाव वेगाने तिला मागून धडक दिली. या अपघातात तिच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने तिचा जागेवर मृत्यू झालाय. तर तिच्या आजोबांचा जीव थोडक्यात बचावला असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
हे पण वाचा
- मेहुणीने स्वतःच्या लग्नात दाजीसोबत दिली अशी पोझ की भावोजी सापडले अडचणीत, अटक होण्याची आली वेळ.
- ‘अर्ध्यावरती डाव मोडीला’…. ‘अधुरी एक प्रेम कहाणी’; अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथे तरुण विवाहितेचा शॉक लागून मृत्यू
- भडगांव तालुक्यातील कजगांव शिवारातील शेतातील विहीरीत आढळला २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह.
- गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी एरंडोल तालुक्यातील एकास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
- Viral Video: एका महिलेच्या दिल्ली मेट्रोत बेभान मादक डान्स, पाहून नेटकरी चक्रावले पहा व्हिडिओ