यावल :- तालुक्यातील चिंचोली येथील एका २५ वर्षीय तरुणाने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेले होते व तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. तेव्हा याप्रकरणी या तरुणाने अल्पवयीन मुलीस पळवून नेण्यासाठी वापरलेले वाहन यावल पोलिसांना गुजरात राज्यातील सुरत येथुन जप्त केले आहे. तर या अल्पवयीन मुलीस तरूणाने उमरगाव येथे ठेवले होते तेथे जावुन पोलिसांना पंचनामा केला आहे
चिंचोली ता. यावल येथील शुभम अरुण पाटील वय २५ याने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी कसले तरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले होते. तर याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरूणास शनिवारी पोलिसांनी अटक केली होती व त्यास ११ जुलै पर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती या पोलिस काेठडीत तरूणाने अल्पवयीन मुलीस पळवून नेण्यासाठी वापरलेले वाहन बाबत कबुली दिली
व गुजरात राज्यातील सुरत शहरातुन ईको वाहन क्रमांक एम.एच. ४८ बी.ए. ५२३८ हे पोलिसांनी जप्त केले तर तरूणाने सुरत जवळील उमरगाव येथे एका खोलीत अल्पवयीन सोबत थांबला होता तेथे जावुन पोलिसांनी पंचनामा केला आहे. तर गुरूवारी या तरूणाची पोलिस कोठडी संपणार असुन त्याला भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केलेे जाणार आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.
हे पण वाचा
- मेहुणीने स्वतःच्या लग्नात दाजीसोबत दिली अशी पोझ की भावोजी सापडले अडचणीत, अटक होण्याची आली वेळ.
- ‘अर्ध्यावरती डाव मोडीला’…. ‘अधुरी एक प्रेम कहाणी’; अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथे तरुण विवाहितेचा शॉक लागून मृत्यू
- भडगांव तालुक्यातील कजगांव शिवारातील शेतातील विहीरीत आढळला २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह.
- गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी एरंडोल तालुक्यातील एकास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
- Viral Video: एका महिलेच्या दिल्ली मेट्रोत बेभान मादक डान्स, पाहून नेटकरी चक्रावले पहा व्हिडिओ