VIDEO: लखनऊ :- मित्रांमध्ये अनेकदा विविध गोष्टींवरुन पैज लावली जाते. स्टंटबाजी असो वा वेगाने गाडी चालवणे, उंचावरुन उडी मारणे असो वा लांब अंतरापर्यंत पोहणे असो लोक कसलाही विचार न करता पैज स्वीकारण्यास घाबरत नाही, पण अशाने ते आपला जीव धोक्यात घालतात. काहीवेळा मित्र अशा काही पैज लावतात की, ज्यातून आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो याचीही विचार केला जात नाही,
अशाचप्रकारे लखनऊच्या इटौंजामध्ये दोन मित्रांनी १५ हजार रुपयांसाठी ट्रॅक्टर ओढण्याची पैज लावली, पण ही पैज पूर्ण करण्याच्या नादात एकाच अतिशय वेदनादायक पद्धतीने मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.ही घटना दुपारच्या वेळेस घडली. एका रिकाम्या शेतात दोन मित्रांमध्ये लागलेली ट्रॅक्टर ओढण्याची पैज पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमा झाली होती. नीरज आणि जोगेंद्र नावाचे दोन मित्र आपापल्या ट्रॅक्टरमधून आले.
त्यांच्यात १५ हजार रुपयांची पैज लागली होती. यावेळी दोघांनीही आपले ट्रॅक्टर एकमेकांच्या विरुद्ध दिशेने उभे केले आणि दोन्ही ट्रॅक्टर लोखंडी साखळीने बांधले. कोण विरुद्ध दिशेने असलेला ट्रॅ्क्टर ओढण्यात यशस्वी होईल, तो १५ हजार रुपये जिंकेल, अशी ही पैज होती. पैज सुरू होताच दोघांनीही ट्रॅक्टर चालवायला सुरुवात केली पण जोगेंद्रच्या ट्रॅक्टरने नीरजचा ट्रॅक्टर जोरात खेचला, त्यामुळे नीरजचा ट्रॅक्टर समोरच्या दिशेने वर उलटला. यावेळी ट्रॅक्टर नीरजच्या अंगावर उलटला आणि तो त्याखाली दबला गेला.यानंतर लोकांनी आरडाओरडा करत जोगेंद्रला ट्रॅक्टर थांबवण्यास सांगितले आणि नीरजचा ट्रॅक्टर सरळ करण्याचा प्रयत्न केला.
ट्रॅक्टरखाली नीरज अतिशय वाईटरित्या दबला गेला, ज्यामुळे त्याचे शरीर कोणताही हालचाल करेनासे झाले. गावकऱ्यांनी मिळून ट्रॅक्टर सरळ करून नीरजला रुग्णालयात नेले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. लोकांचे म्हणणे आहे की, नीरजला ट्रॅक्टर स्टंटचा शौक होता आणि त्याने यापूर्वीही दोनदा अशीच पैज जिंकली होती. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.या परिसरात अशाप्रकारे जीवघेणा स्टंट सुरू असल्याची कल्पना पोलिसांना नव्हती. याप्रकरणी पोलीस अधिकारी म्हणाले की, हे प्रकरणाची दखल घेत तपास केला जात आहे, या स्टंटबाजीसाठी पैज लावण्यात आणखी कोणत्या लोकांचा समावेश होता, त्या लोकांची ओळख पटवली जाईल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल.
हे पण वाचा
- मेहुणीने स्वतःच्या लग्नात दाजीसोबत दिली अशी पोझ की भावोजी सापडले अडचणीत, अटक होण्याची आली वेळ.
- ‘अर्ध्यावरती डाव मोडीला’…. ‘अधुरी एक प्रेम कहाणी’; अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथे तरुण विवाहितेचा शॉक लागून मृत्यू
- भडगांव तालुक्यातील कजगांव शिवारातील शेतातील विहीरीत आढळला २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह.
- गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी एरंडोल तालुक्यातील एकास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
- Viral Video: एका महिलेच्या दिल्ली मेट्रोत बेभान मादक डान्स, पाहून नेटकरी चक्रावले पहा व्हिडिओ