सीकर (राजस्थान) :– मध्ये एक भयंकर घटना घ़डली आहे. दोन दिवसांपूर्वी रस्त्याच्या कडेला एका महिलेचा मृतहेद सापडला होता. त्याबाबत पोलिसांनी आता मोठा खुलासा केला आहे. महिलेच्या पतीनेच तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह फेकला होता.धक्कादायक बाब म्हणचे अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच या दोघांनी लव्हमॅरेज केलं होतं. मात्र लग्नानंतर दोघांमध्ये वाद होत असल्याने पतीने तिचा काटा काढला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिखा अग्रवाल हिचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. ४ डिसेंबर २०२३ रोजी तिचं पंकज बत्रासोबत लव्हमॅरेज झालं होतं. शिखा आणि पंकज हे दोघेही बँकेत काम करायचे ते एका भाड्याच्या घरात राहत होते. पण लग्नानंतर एका महिन्यात दोघांमध्ये खूप वाद होऊ लागले. त्यामुळे शिखा आपल्या माहेरी निघून गेली. आपल्या वडिलांच्या घरी ती राहू लागली. पोलिसांनी केलेल्या तपासात असं आढळून आलं की, १६ जून रोजी संध्याकाळी सात वाजता पंकजने फोन करून शिखाला नेहरू पार्क ग्राऊंडमध्ये भेटायला बोलावलं.
त्यानंतर शिखा घरी परत आलीच नाही. कुटुंबीयांनी दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. शिखाच्या वडिलांनी याबाबत पोलिसांत माहिती दिली. पोलिसांनी दोघांच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस केलं तेव्हा पंकजचा फोन स्वीच ऑफ आला. तर शिखाचा फोनचं लोकेशन खादरा जवळ दाखवलं. पंकजने शिखाला भेटायला बोलावलं होतं. तेव्हा फिरण्याच्या बहाण्याने तो तिला आपल्या गाडीतून घेऊन गेला.
त्यानंतर ते दोघेही रस्त्याच्या कडेला एका निर्जनस्थळी बोलत होते. तेव्हात आपल्या कारमध्ये पंकजने शिखाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर कारमधून मृतदेह बाहेर काढून तो रस्त्याच्या कडेला फेकला. यानंतर पंकज फरार झाला होता. पण त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. पंकजची पोलिसांनी कसून चौकशी केली असतान त्याने आपणच शिखाची हत्या केल्याचं कबूल केलं आहे. पोलिसांपासून वाचता यावं म्हणूनच त्याने पत्नीचा फोन एका दुसऱ्या ठिकाणी फेकून दिला. सततची भांडणं आणि नात्यातील दुरावा यामुळेच तिची हत्या केल्याचं म्हटलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हे पण वाचा
- महावितरणकडून धडक मोहीम,विज बिल कमी यामुळे मीटर चेकिंग मोहीम,७७ वीज ग्राहकांचे मीटर घेतले तपासणीसाठी ताब्यात.
- कांताई धरणाच्या पाण्यातून यंत्राच्या साह्याने भरमसाठ अवैध वाळू उपसा ; ऊपाय योजना करा मागणी.
- आजचे राशी भविष्य सोमवार दि.२० जानेवारी २०२५
- एरंडोल बस आगारातर्फे इंधन बचत या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन.
- लग्नानंतर अवघ्या एकाच महिन्यात त्यांच्या संसाराला लागली दृष्ट; पतीचा मृत्यू नंतर विरह सहन न झाल्याने तिसऱ्याच दिवशी पत्नीने संपविले जीवन.