झालावाड :- (राजस्थान) एक धक्कादायक घटना घडली आहे. तरुणीने प्रेम विवाह केला म्हणून कुटुंबीयांनी तिची निर्घृणपणे हत्या केली आहे. राजस्थानच्या झालावाड येथे ही घटना घडली असून 24 वर्षांच्या तरुणीला तिच्याच कुटुंबीयांनी संपवले आहे.ऑनर किलिंगच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे तिच्याच कुटुंबीयांनी अपहरण केले होते. तिच्या पतीसोबत असताना तिच्या कुटुंबीयांनी तिला त्याच्या डोळ्यांदेखत अपहरण केले.
त्यानंतर तिची हत्या करुन तिच्यावर स्मशानात गुपचूप अत्यंसंस्कार करण्यात आले. या प्रकरणातील आरोपी सध्या फरार असून पीडित महिलेचा मृतदेह 80 टक्के जळाला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून सर्व आरोपी फरार आहेत. महिलेचे अर्धवट जळालेल्या अवस्थेत असलेला मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिमला कुशवाह असं या महिलेचे नाव असून एक वर्षांपूर्वी गावातील रवी भिल याच्यासोबत तिने प्रेमविवाह केला होता. या प्रेम विवाहामुळं त्यांचे कुटुंबीय नाराज होते.
याच कारणामुळं महिला आणि तिचा पती वेगळे राहत होते. ते मुळगावापासून लांब असलेल्या गावात पाहत होते. गेल्या काही दिवसांपासून हे जोडपं मध्य प्रदेशातील एका ठिकाणी राहत होते. गुरुवारी दोघंही त्यांच्या मुळ गावी बँकेत आले होते. पैसे काढण्यासाठी ते बँकेत आले होते. याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना मिळाली. महिलेच्या कुटुंबीयांनी महिलेच्या पतीसमोरुनच तिचे अपहरण केले. त्याचवेळी पती रवीने घटनास्थळावरुन पळ काढत त्याचा जीव वाचवला. मात्र महिलेच्या कुटुंबीयांनी तिची हत्या केली.
त्यानंतर आरोपींनी तिचा मृतदेह स्मशानभूमीत नेऊन त्यावर अत्यंसंस्कार केले. तर, एकीकडे पतीने तिच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पण तोपर्यंत आरोपी फरार झाले होते. महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह जाळल्याप्रकरणी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले आहेत. यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासले आहे. यात महिलेचे अपहरण करताना कुटुंबीय दिसत आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






